scorecardresearch

Video Viral: ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्‍कर्टमध्ये मेट्रोत दिसली; नाही ही ‘उर्फी’ नाही…

Delhi Metro Viral Video : अतरंगी कपड्यांमधील फोटोंमुळे उर्फी लक्ष वेधून घेत असते. दरम्यान, आता उर्फीला टक्कर देण्यासाठी उर्फीची जुळी बहीण आली आहे.

bold girl spotted in delhi metro
मेट्रोमध्ये दिसली नवी उर्फी(Photo-Twitter)

सोशल मीडियावर आपल्या विचित्र ड्रेसिग सेन्समुळे नेहमीच उर्फी जावेद चर्चेत असते. उर्फीचे चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अतरंगी कपड्यांमधील फोटोंमुळे उर्फी लक्ष वेधून घेत असते. दरम्यान, आता उर्फीला टक्कर देण्यासाठी उर्फीची जुळी बहीण आली आहे. तरुण पीढीमध्ये सध्या उर्फिला फॅशन ऑयकॉन म्हणून पाहिलं जातं आहे का? असा प्रश्न पडला आहे. कारण सध्या मेट्रोमध्ये उर्फीची जुळी बहीण पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

उर्फीची जुळी बहीण ? –

सोशल मीडिया मुंबई लोकल ट्रेन आणि मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक मेट्रोमधला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मेट्रोमध्ये अनेक जण प्रवास करत आहेत. मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर दोन तरुणी बसलेल्या दिसतं आहेत. एका तरुणीने काळ्या रंगाची बॅग समोर घेतली आहे. सगळं एकदम नॉर्मल वाटत आहे, पण जेव्हा ही तरुणी सीटवरुन उठते त्यावेळी तिचे कपडे पाहून मेट्रोमधील प्रवाशांना चांगलाच घाम फुटतो. कारण तिने मिनी स्‍कर्ट आणि ट्रेंडी ब्रा याशिवाय काहीच घालतं नव्हतं. हे पाहून प्रत्येकाला उर्फीचं आठवली असणार. तर काहीजणांच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन असं वाटतंय की ही उर्फीची जुळी बहीण तर नाही असाच हे विचार करत असणार.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video: सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘साहेब’च बनले ड्रायव्हर, अनोख्या सन्मानाने फुटला भावनांचा बांध

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नाही ही उर्फी नाही असा शेरा मारण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:05 IST

संबंधित बातम्या