Boyfriend Creative Birthday Surprise : शाळा, कॉलेज, ऑफिस असो किंवा अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात जरी पडले असाल तर तुमच्यात काय वेगळ आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न हे करावेच लागतात.त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने डोकं लावतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण, या व्हिडीओत एका प्रेमात पडणाऱ्या मुलाचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला साथ देणाऱ्या मित्राची गोष्ट बघायला मिळाली आहे.

प्रेयसीला १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्राबरोबर तिच्या बिल्डिंगखाली जातो. बिल्डिंगखाली डिलिव्हरी बॉय उभा असतो. तर प्रियकर तिच्या घरापर्यंत केक पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला त्यांचे टीशर्ट आणि हेल्मेट द्यायला सांगतो. मग डिलिव्हरी बॉय सुद्धा अगदी आनंदाने प्रियकराची मदत करायला तयार होतो. त्यानंतर प्रियकर प्रेयसीच्या घरी केक घेऊन जातो आणि दोघेही मिळून वाढदिवस साजरा करतात.

मित्राच्या आनंदात आनंद शोधणारा (Viral Video)

वाढदिवस प्रत्येकासाठी खास दिवस असतो. तसेच या दिवशी आपल्या खास व्यक्तीने काही तर सरप्राईज दिले पाहिजे असे सुद्धा मनातून वाटत असते. तर कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून प्रियकर तिच्या घराबाहेर केक घेऊन जाण्याची सगळ्यात मोठी रिस्क घेतो. तसेच नशीबवान प्रियकराला हा प्लॅन पूर्ण करण्यासाठी बेस्ट फ्रेंड सुद्धा मदत करतो. तो केक कापेपर्यंत प्रियकराचा सगळ्या गोड क्षणांचे अगदी सिनेमा सुरु आहे तसे शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये करत असतो.

व्हिडीओ नक्की बघा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @chalte_phirte098 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सगळेच युजर्स भारावून गेले आहेत आणि प्रियकराच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत “जर त्याला मनापासून करायचं असेल तर तो नक्कीच करेल”, “मित्राच्या आनंदात आनंद शोधणारा”, “तिला भीती वाटतं होती की, शेजारी येतील. पण, हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकायला तिला अजिबात भीती वाटत नाही!”, “मिशन सक्सेसफुल”, “बॉयफ्रेंडपेक्षा जास्त मित्र उत्साही वाटतोय”, “यांच्या घरचे रील बघत नाहीत का”, “जेव्हा तो खरंच प्रेमात असतो”, “शेवटी प्रयत्न महत्वाचे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.