Viral Video: लग्न म्हटलं की मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. त्याशिवाय लग्नात कधी काय घडेल हेदेखील सांगता येत नाही. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अशी मजामस्ती करण्यामागे अनेकदा नवरदेवापेक्षा त्याचे मित्रच जास्त उत्साही असतात. अनेकदा हे मित्र आपल्या नवरदेव मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर कशी मजा घेता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. तसेच काही मित्र आपल्या नवरदेव मित्रासाठी खास डान्सदेखील करतात. आता अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात नवरदेवाचे मित्र डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा नवऱ्याचे मित्र हटके गिफ्ट देताना दिसतात; तर कधी लग्न सुरू असताना विचित्र विनोद करताना दिसतात. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये नवरदेवाचे मित्र नवऱ्यासोबत मंडपात ल्युडो खेळताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण आपल्या मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते “मन डोले मेरा तन डोले”, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते करत असलेला डान्स खूपच सुंदर असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @amanavdc या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ३० मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर दोन मिलियनहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “नवऱ्याचे मित्र खूप कुल आहेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “काय नाचले राव, नाहीतर आमचे मित्र”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “खूप छान व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “मित्र असावे तर असे.”