लग्नसराईच्या मोसमात सोशल मीडियावर लग्नाचे फोटो-व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून रोज नवनव्या गंमतीदार गोष्टी समोर येत आहे. मजेशीर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंतीही मिळत आहे. आता लग्नमंडपात एका वधूने थेट वराला लग्न का करायचं आहे?, असा प्रश्न लग्न मंडपात विचारला. त्यावर वराने दिलखुलासपणे उत्तर दिलं. हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडिओ ‘द वेडिंग ब्रिगेड’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलं आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेअर केला आहे.

व्हिडिओत वधू वराला विचारते, “तुम्हाला लग्न का करायचं आहे?”, त्यावर वराने आपल्या शैलीत उत्तर दिलं, “कारण मला शांतता नको आहे”. वराने दिलेलं उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हस्यकल्लोळ झाला आणि वधूवरालाही हसू आवरता आलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हो, मला आता शांतता नको आहे, म्हणून मी लग्न करत आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हे उत्तर खरे आहे, मी विचार करत राहतो की लोक रस्त्यावरही कसे सामना करतात.’