Pre Wedding Photo Shoot Viral Video: लग्न करण्याची कारणं काय तर आपल्याला आयुष्यभरासाठी एक हक्काचा जोडीदार मिळावा. आपल्या प्रेमाची कबुली चारचौघांसमोर देता यावी. कुटुंबाचे आशीर्वाद लाभावेत. अलीकडे या सगळ्या यादीत ‘लग्न करावं तर फोटोसाठी’ हे नवं कारणही जोडलं गेलं आहे. आयुष्यभरासाठी सोशल मीडियावर पोस्ट करायला फोटो कमी पडू नयेत याची सोय अनेक नवरा-नवरी त्यांच्या लग्नात करून ठेवतात. पूर्वी लग्नात किती ठरवलं तरी गडबडीत विशेष फोटो काढण्यासाठी ब्रेक घेणं राहून जायचं म्हणूनच हुशार वधू वरांनी प्री वेडिंग नावाचा एक भन्नाट उपाय शोधून काढला. सोशल मीडियावर अशाच एका भन्नाट प्री वेडिंग शूट व्हायरल होत आहे.

ट्विटरवर @HasnaZarooriHai या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य लग्नाच्या कपड्यांमध्ये नवरा नवरी दिसत आहेत. कदाचित हे जोडपं आपल्या फ्युजन कलेचं प्रतीक म्हणून फोटो काढू इच्छित आहेत. कारण यामध्ये वधू भरतनाट्यम करताना तर नवरा हा हातावर उलटा होऊन हेडस्टँड करताना दिसत आहे, ही हिपहॉपची एक प्रसिद्ध स्टेप आहे. आजूबाजूचे दृश्य एका मंदिरातील दिसत आहे. नवरा नवरीचे हे भन्नाट शूट पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

प्री वेडिंग शूटचा भन्नाट व्हिडीओ

Video: नवरीपेक्षा करवली भारी, नवरोबांचा तोल ढळला आणि भर मंडपातच.. वऱ्हाडी झाले थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आल्यापासून आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. अवघ्या 38 सेकंदांच्या या व्हिडिओला हजारो लाईक व कमेंट मिळाल्या आहेत. अनेकांनी या जोडप्याचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी नशीब आपल्या काळात असं काही नव्हतं अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. प्री वेडिंगसाठी आता लोक कुठल्या थराला जातील याचा अंदाज नाही असेही काहींनी म्हंटले आहे.