Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या एक तरूणी ‘तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करें’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी तिच्या कॉलेजमधील फेयरवेल पार्टीमध्ये ‘तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करें’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तरूणी करत असलेल्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ankitaaaa_official या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास ६० मिलियनहून अधिक आणि तीन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूपच छान नाचली” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “याला म्हणतात डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “अरे व्वा डान्स असावा तर असा”