सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि एक उत्तम शिकारीसुद्धा आहे. ते निवडलेल्या कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतात आणि खाऊ शकतात. सिंह (Lions) मगरींची शिकारही करतात पण मगरही (Crocodile) फार मोठी आणि शक्तिशाली असते त्यामुळे ही लढाई जास्त वेळ चालू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीचे पाणी पिणाऱ्या सिंहावर मगरीने घात केला असता, तर ही लढाई लगेचच संपली असती. परंतु तसं होताना दिसत नाहीये.

एक नव्हे तर तब्बल तीन सिंहांनी पाण्यातल्या मगरीचा घात केला. यात दोन सिंहीण आणि एक सिंह एका उथळ तलावात खाऱ्या पाण्याच्या मगरीवर टोळी मारताना दाखवले आहे. तीन भुकेल्या सिंहांनी मगरीची शिकार करण्यासाठी त्याच्यावर झेप घेतल्याने मगर आपल्या जीवासाठी लढताना दिसली. सिंहांनी उडी मारल्याने मगर आपल्या जबड्याने सिंहांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते.

(हे ही वाचा: प्रेरणादायी! ५ कंपन्यांमधील डिलिव्हरी बॉय ते सॉफ्टवेअर इंजिनीअर… घरोघरी ऑर्डर पोहोचवतानाच शिकला कोडिंग)

(हे ही वाचा: घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या लढाईच्या व्हिडीओला ६२,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओला लाईक करत पसंती दर्शवली आहे. अंगावर काटा आणणारा हा लढाईचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.