Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. एक वेळ एखादा पुरुष आपल्या बायकोनं सांगितलेल्या काही गोष्टी ऐकत नाही; पण आपल्या लाडक्या लेकीनं सांगितलेल्या अनेक गोष्टी मागचा-पुढचा विचार न करता, लेकीच्या आनंदासाठी करतो. आता व्हायरल होत असलेल्या असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
हल्ली अनेक शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांसह त्यांच्या पालकांनाही आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आता समोर आलेल्या व्हिडीओतही मुलीच्या शाळेतील कार्यक्रमात तिच्याबरोबर तिचे बाबा नाचताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेमध्ये फादर्स-डे निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एका बाप-लेकीची जोडी “तुमसे ही दिन होता है…” या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या बाबांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. शिवाय त्यांच्या या डान्समधून त्यांच्या नात्यातील प्रेमही जाणवत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @holyangels.school या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाईक्स मिळाल्या आहेत. एकाने लिहिलंय की, “पप्पा खूप छान नाचले”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “या लेकीच्या आयुष्यातील सुंदर क्षण”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “फादर्स ऑफ-द इअर”