पूर्वी शेतीचे पाखरांपासून, प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या मधोमध बुजगावणं अर्थात माणसासारखा दिसणारा पुतळा उभा करुन ठेवायचे. पण आता त्याचा फारसा फरक पडत असल्याचे दिसत नाही. यामुळे अनेक पक्षी, प्राणी, शेतात येऊन पिकांची नासाडी करून निघून जातात याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशावेळी दिवसभर उन्हात-तान्हात उभं राहणं शेतकऱ्यांना अवघड होत आहे. अशास्थितीत पक्षी आणि प्राण्यांना शेतीपासून दूर ठेवण्यासाठी एका शेतकऱ्याने एक नवा स्वदेशी यंत्राचा वापर केला आहे. शेतकऱ्याचा हा देसी झुगाड आता व्हायरल होत आहे.
प्राणी, पक्ष्यांना शेतातून हाकलण्याची देसी पद्धत
पक्षी, प्राण्यांनी पिकांची नासाडी करु नये यासाठी शेतकऱ्याने एक अनोखे यंत्र वापरले आहे. हे यंत्र शेतात सतत आवाज करत राहते. यामुळे प्राणी, पक्षी शेतापासून दूर राहतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बाजरीच्या शेतामध्ये प्राणी आणि पक्ष्यांना हाकलवण्यासाठी एक मशिनरी मोटरचा वापर केल्याचे दिसून येत आहे. ज्यात एक पंखा बसवण्यात आला आहे, जो पंखा वाऱ्याबरोबर आपोआप फिरु लागतो.
यासोबत पंख्याच्या उलट्या बाजूने एक छोटा रॉड बसवला आहे. तसेच त्याखाली एक स्टीलची प्लेट आहे. पंखा वाऱ्यासोबत जसा फिरतो तसा तो रॉड देखील फिरतो आणि खालच्या स्टीलच्या प्लेटवर जाऊन आपडत राहतो. वाऱ्याचा वेग कमी झाला की पंख्याचा वेगही कमी होतो. पण सतत होणाऱ्या आवाजामुळे पक्षी शेतापासून दूर राहतात. या यंत्रासाठी कोणतीही वीज किंवा बॅटरीची गरज लागत नाही.
हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडला असाल की, पक्ष्यांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्याला ही अनोखी आयडीया सुचली कशी? जुगाड लाईफ हॅक्स नावाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पक्ष्यांना हाकलण्याचा सोप्पा मार्ग. अनेक युजर्सना शेतकऱ्याची ही आयडीया फारचं आवडली आहे. तर काही युजर्सनी हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणंचा आहे ते विचारले आहे.