Viral Video: सोशल मीडियावर हल्ली कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ युजर्सकडून शेअर केले जातात. परंतु, यातील मोजकेच व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेत येतात. कधी डान्स, कधी गाण्याचे तर कधी वेगळ्याच मजेशीर व्हिडीओंना नेटकरी पसंती देतात. दरम्यान, आता अशाच पद्धतीचा एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात डोंबिवलीमध्ये चक्क बर्फ पडत असल्याचे दिसत आहे. परंतु, हा व्हिडीओ AI असल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या दैनंदिन जीवनातला AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक जण त्यांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी एआय (AI)ची मदत घेताना दिसत आहे. पर्सनलसह प्रोफेशन आयुष्यतही AI चा उपयोग केला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर AI च्या मदतीने अनेक फोटो, व्हिडीओ बनवले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनेकांनी घरातील बाप्पाच्या फोटोबरोबरही AI व्हिडीओ तयार केले होते, ज्यात बाप्पा निरोप घेण्यापूर्वी घरातील सदस्यांना मिठी मारताना दिसला. दरम्यान, आता काही शहरांचे AI व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्या शहरात बर्फ पडल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओची सुरुवात डोंबिवली स्थानकापासून झाली असून त्यानंतर डोंबिवलीतील चौक आणि काही रस्ते दाखवण्यात आले आहेत. यावेळी संपूर्ण डोंबिवली बर्फमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरं तर हा व्हिडीओ AI आहे, परंतु व्हिडीओ पाहिल्यावर काही क्षण हे डोंबिवलीत खरंच बर्फ पडतोय असे तुम्हाला वाटेल. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dombivlivibes या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्सदेखील करत आहेत. एकाने लिहिलंय की, “वाव, अशी आमची डोंबिवली असती तर”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मला ही जादू खरंच करता आली असती तर”, तर आणखी एकाने लिहिलंय, “इथे चालायला धड रस्ते नाहीत आणि स्वित्झर्लंडचे स्वप्न दाखवलं जात आहे.”