Drunk watchman Viral Video : तुम्ही थकून रात्री घरी येता मग फ्रेश होता. त्यानंतर खूप भूक लागली आहे म्हणून जेवण्यासाठी ताट घेता. मग पुढे जेवण वाढून घेण्यासाठी तुम्ही टोपाजवळ जाता तेव्हा बघता तत काय भाताच्या भांडयात माशी, कीटक नव्हे तर चक्क शेजारी झोपलेल्या एका माणसाचा पाय असतो. ऐकून धक्का बसला ना? मग अशीच काहीशी घटना गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री तेलंगणाच्या एका महाविद्यालयात घडली आहे.

तेलंगणाच्या इस्माईलखानपेट येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहात ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री वसतिगृहातील विद्यार्थी जेवायला आले तेव्हा त्यांना या दृश्याला सामोरे जावे लागले. सर्व्हिंग काउंटरवर भाताच्या भल्यामोठ्या टोपाच्या बाजूला ड्युटीवर मद्यधुंद अवस्थेत वॉचमन झोपला होता. एवढेच नाही तर त्याच एक पाय भाताच्या भांड्यात सुद्धा होता. विद्यार्थ्यांनी घाबरून आणि वैतागून त्यांनी ताबडतोब अन्न कंत्राटदाराला कळवले, ज्यावर त्वरित प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी एस.आर.डी. प्रवीण्य यांनी व्हिडीओ पाहून वॉचमनला तात्काळ कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, वॉचमन डायनिंग हॉलच्या काउंटरवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसतो, त्याचा उजवा पाय थेट विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी बनवलेल्या भाताने भरलेल्या भांड्यात बुडाला आहे. कॅमेरा जसजसा जवळ येतो तसतसे कण त्याच्या पायाला चिटकलेले दिसत आहेत. वॉचमन झोपेत हालचाल करण्यास सुरुवात करतो, ज्यामुळे त्याचा पाय भांड्यातून आत आणि बाहेर घसरतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @HateDetectors या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फुटेजमुळे सोशल मीडियावरील युजर्सना धक्का बसला आहे. व्हिडीओ बघून वसतिगृहाच्या परिसरात स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न कमेंटमध्ये विचारू लागले आहेत.