लग्न म्हटलं की मजा-मस्ती, धम्माल, गडबड या गोष्टी तर आल्याच. परंतु काही वेळा लग्नात अशा काही गोष्टी घडतात, ज्यांची आपल्याला कल्पना देखील करता येत नाही. असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्न राहिलं बाजूला, पण भर मंडपात नवरा-नवरीमध्ये हाणामारी झाली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून हसून हैराण व्हाल, हे मात्र नक्की. या व्हिडीओमधल्या संतापलेल्या नवरीनं भर मांडवात नवरदेवाची जी धुलाई केली ती पाहण्यासारखी आहे. या भांडणामुळे मग मांडवात एकच गोंधळ माजला. या चक्रावून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी दोघे मंडपात बसलेले दिसून येत आहेत. काही वेळात दोघंही फेरीसाठी उभे राहणार तितक्यात नवरदेवाने नवरीची फिरकी घेतली. लग्नाची विधी सुरू असताना नवरी रागाने नवरदेवाच्या दिशेने हात भिरकावते. पण नवरदेव तिच्या या कृतीला प्रतिकार करताना दिसतोय. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. हे भांडण इतकं वाढतं की भर मंडपात दोघांमध्ये कुस्ती रंगते. आजूबाजूचे लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. हे भांडण नक्की कशामुळे झालं, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. यात नवरी इतकी चिडते की वचपा काढण्याच्या नादात ती जमिनीवर लोळून लोळून नवरदेवाला मारहाण करते.

आणखी वाचा : नाग-नागिणीची जोडी जेव्हा रोमॅंटिक होते… पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. thegushti नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना त्यांचं हसू आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ पाहून लोक पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बॉयफ्रेंड असावा तर असा…झाडाखाली बसून हे लव्ह बर्ड्स काय करत आहेत? पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नवरा-नवरीचं भांडण कशामुळे झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. काही इन्स्टाग्राम युजर्सनी कमेंटमध्ये असं लिहिलं की, “लग्नाच्या दिवशी जर ते इतके भांडत असतील तर यांचं लग्न जास्त काळ टिकणार नाही.” “या पृथ्वीवर काय चाललं आहे?”, एका युजरने लिहिले की, “त्यांनी किमान हॉटेलमध्ये परण्याची प्रतीक्षा तरी करायची, कुटुंब आणि मित्रांसमोर कशाला भांडण करायचं?” तिसऱ्याने युजरने लिहिलं की, “ओएमजी…कदाचित त्यांनी या लग्नाचा पुनर्विचार करावा.” चौथ्या युजरने उपहासाने म्हटलं की, “ठीक आहे, आयुष्यभरासाठीची कमीटमेंट सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे..”