शाळेत वार्षिक परीक्षा संपली की विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागते. वर्षभरातील अभ्यासाचे ओझे विसरून या सुट्टीचा मनसोक्त आनंद कधी घेतोयं असे या शाळेतील प्रत्येक मुलांना वाटते. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर आणि मनात उन्हाळी सुट्टीत उशिरा उठायचे, दिवसभर खेळायचं, मामाच्या गावी जायचं ही ओढ मुलांच्या मनात निर्माण होते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका चिमुकलीचा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर असतो आणि ती हा आनंद अगदी वेगळ्याच स्टाईलमध्ये व्यक्त करते.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन चिमुकली घरी येत असते. चिमुकलीच्या पाठीवर दप्तर आणि हातात बास्केट असते, तर चिमुकली इमारतीच्या शिड्यांवरून येता येता डोक्यावर बास्केट घेऊन डान्स करण्यास सुरुवात करते. जमाल कुडू हे गाणं वाजत आणि चिमुकली परीक्षा संपल्याचा आनंद व्यक्त करताना दिसते. एकदा पाहाच हा भन्नाट व्हिडीओ.

Woman fulfills Bollywood dream by dancing to Sridevi song
श्रीदेवीप्रमाणे साडी नेसून बॉलीवूड गाण्यावर महिलेने केला डान्स, लेकाने पूर्ण केले आईचे स्वप्न! पाहा Viral Video
KL Rahul Catch and LSG Owner Sanjeev Goenka Reaction Video
LSG v DC: केएल राहुलचा डायव्हिंग झेल पाहून संजीव गोयंका जागेवरून उठले अन्… VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
first woman director of IIT Madras
IIT, MIT मधून पदवी ते पीएचडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या आयआयटी मद्रासच्या पहिल्या महिला डायरेक्टर कोण? पाहा
Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…
ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

हेही वाचा…एसीतून येणाऱ्या पाण्याचा ‘असा’ करा पुनर्वापर, आनंद महिंद्रांनी पाणी साठवण्यासाठी सुचवलं ‘हे’ उपकरण; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

ॲनिमल चित्रपटातील जमाल कुडू या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या गाण्यात बॉबी देओलनं डोक्यावर ग्लास ठेवून केलेली स्टेप अनेकांच्या पसंतीत उतरली. तर या सिग्नेचर स्टेप्सला फॉलो करीत अनेक युजर्सनी भन्नाट रीलसुद्धा बनवले. तर आज या चिमुकलीनेसुद्धा या गाण्यातील सिग्नेचर स्टेप हुबेहूब कॉपी करत डोक्यावर दप्तर ठेवून हा डान्स केला आहे; जो अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

परीक्षा संपली हे पाहून चिमुकलीचा आनंद गगनात मावत नाही आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @arvindchotia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून, ‘परीक्षेचा किती दबाव असतो लहान मुलांना’, ‘खूप सुंदर व्हिडीओ’; तर अनेक जण शाळेतील काही आठवणी सांगताना व्हिडीओखाली कमेंट बॉक्समध्ये दिसून आले आहेत.