Viral Video: जर मुलं दोघांची आहेत मग फक्त आईनेच सांभाळ का करायचा? वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या वादामुळे अलीकडे जबाबदाऱ्यांचा वाटणीमध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. आता आईच नव्हे तर अनेक वडील सुद्धा आपल्या बाळासोबत वेळ घालवताना पाहायला मिळतात. अर्थात आता या पालकांच्या पद्धती त्यांच्या स्वभावानुसार वेगळ्याच असतात. यावरून अनेक मिम्ससुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशीच कूक बाप-लेकाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
जोगा बोनिटो (@ufcfooty) नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक बाबा आपल्या बाळासोबत फुटबॉलचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेल्याचे दिसतेय. एवढ्या गर्दीत बाळाला कंटाळा येऊ नये यासाठी या हुशार बाबाने चांगली तरतूद केली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की स्वतः गेम एन्जॉय करताना त्याने हटके अंदाजात बाळाच्या मनोरंजनाचीही सोय केली आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ
स्वतः खेळ पाहण्यात मग्न असताना त्याने बाळासाठी मोबाईल हातात धरला आहे तर त्याच्या हातातील मोबाईमध्ये कार्टून पाहताना हा चिमुकला सुद्धा निवांत बसून एन्जॉय करतोय.
या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. या माणसाला “फादर ऑफ द इयर.” पुरस्कार द्या असे एकाहून म्हंटले आहे तर तुम्ही वडिलांबरोबर मुलांना ठेवाल तर असेच भन्नाट प्रकार पाहायला मिळतील असेही काहींनी कमेंट बॉक्समध्ये म्हंटले आहे.