व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधून काढतात. विविध ऑफर्स, वेगवेगळ्या डिझाइन, अनोख्या थीम आणि विविध लाइटिंग्सची सजावट करून त्यांच्या हॉटेल्स किंवा दुकानांची सजावट करतात. हे पाहून अनेक ग्राहक या हॉटेलमध्ये किंवा दुकानात कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर हजेरी लावतात. तर नुकतेच सोशल मीडियावर बिहारच्या समस्तीपूरमध्ये अशी अनोखी कल्पना असणाऱ्या एका रेस्टॉरंटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

बिहारच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘ट्रेन रेस्टॉरंट’ असे आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी टेबल-खुर्च्या तर आहेतच, पण इथे ग्राहकांची ऑर्डर घेण्यासाठी टेबलावर वेटर किंवा स्टाफ येत नाही, तर इथे ट्रेनमधून पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात. म्हणजेच तुम्ही एखादा पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केला, तर इथे तुम्हाला ट्रेनच्या मदतीने पदार्थ टेबलावर आणून दिले जातील. ट्रेन थीमचे हे अनोखे रेस्टॉरंट एकदा तुम्हीसुद्धा बघा.

Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..

हेही वाचा…VIDEO : पठ्ठ्याने सायकलच्या चाकापासून बनवले ‘असे’ फिरते डायनिंग टेबल; जुगाड पाहून युजर्स म्हणाले, ‘फाइव्ह Star… ‘

व्हिडीओ नक्की बघा :

रेस्टॉरंटमधील प्रत्येक टेबलावर ग्रीन ग्रास आणि त्यावर काही रूळ तयार केले आहेत. ऑर्डर या रुळावरून ट्रेनमार्फत ग्राहकांपर्यंत पोहचवतात. तसेच या रेस्टॉरंटच्या प्रत्येक टेबलावर विविध स्टेशनचे म्हणजेच मुंबई सेंट्रल, नवी दिल्ली, चेन्नई असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडत्या स्टेशनचे नाव असणाऱ्या टेबलावर बसू शकतात आणि नंतर पदार्थ ऑर्डर करू शकतात. त्यानंतर तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत ट्रॅकवरून ट्रेन घेऊन येईल.

व्हिडीओत एका ग्राहकाने चहा ऑर्डर केला होता, तर रुळावरून ट्रेनद्वारे हे चहाचे कप ग्राहकाच्या टेबलपर्यंत पोहचवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रतीक यांच्या @prateek_bihari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी रेस्टॉरंटच्या रचनेचे आणि त्याच्या खास वैशिष्ट्यांचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.