Viral Video: समाजमाध्यमांवर सतत नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील डान्स, गाणी, रेसिपी, अभिनय अशा विविध विषयांवरील आधारित व्हिडीओंना अधिक प्रमाणात पसंती लाभते. त्यामध्येही डान्स हा अनेकांच्या आवडीचा विषय, मग त्यात जर एखाद्या लावणीचा व्हिडीओ असेल, तर तो व्हिडीओ व्हायरल झालाच म्हणून समजा. आता अशाच एका लावणीचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे.
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून लावणी हा नृत्यप्रकार अधिक लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात काही तरुणी लावणी सादर करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये चार तरुणी लावणी सादर करीत आहेत. त्यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स पाहण्यासारख्या आहेत. त्यांचा हा डान्स पाहून स्टेजसमोर उभे असलेले लोक टाळ्या, शिट्या वाजवून त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @om_sai_dance_academy या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “कोल्हापुरी तडकाच”. आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर पोरींनो”. आणखी एकाने लिहिलेय, “काय भारी नाचल्या राव”.