Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत.अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक मित्रा मित्रांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुले, तरुण मंडळी एवढंच काय तर वृद्ध लोक सुद्धा आवडीने डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मित्रांनी सध्या तुफान ट्रेंडींगवर असणाऱ्या मराठी गाण्याव खतरनाक डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

मित्र म्हणजे प्रत्येक दु:खाचे एक औषध आहे असे अनेकजण म्हणत असतो. जर दोघांपेक्षा अधिकमित्र एकत्र आले की राडा होणे ठरलेले आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच काही मित्रांचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ७ मित्र पायऱ्यांवर बसले आहेत. आणि यावेळी “नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी” या गाण्यावर त्यांनी भन्नाट डान्स केला आहे. अगदी एक एक स्टेप ते करत आहेत. यांच्या या भन्नाट स्टेप्स पाहूनही तुम्हाला हसू येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, मजेसाठी पैसे लागतात पण आयुष्य जगण्यासाठी मित्र लागतात.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by S K U B ?? (@smile_please_1956)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ smile_please_1956 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, “मित्रांशिवाय आयुष्य नाही” आणखी एकाने लिहिलं, “मजेसाठी पैसे लागतात पण आयुष्य जगायला मित्रच लागतात”. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.