King Cobra Viral Video: पृथ्वीवर सापांच्या असंख्य प्रजाती आढळतात. सापांच्या एकूण प्रजातींपैकी काही ठराविक प्रजाती विषारी असतात. भारतातील ५-६ सापांच्या प्रजाती या माणसांसाठी धोकादायक असतात. विषारी सापांच्या एका दंशाने लोकांचा मृत्यू होऊ शकतो. भारतासह आशिया खंडातील काही देशांमध्ये आढळणारा किंग कोब्रा या प्रजातीच्या सापामध्ये खूप विष असते. किंग कोब्रा जिवीतासाठी अन्य सापांवर अवलंबून असतो. तो जंगलामध्ये किंवा नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्याला असतो. किंग कोब्राच्या वास्तव्याच्या ठिकाणी माणसांचा हस्तक्षेप वाढल्याने सापाची ही प्रजाती मानवी वस्तीच्या ठिकाणी राहायला येत असल्याचे पाहायला मिळते.
घरी किंवा घरच्या आसपास असलेल्या परिसरात किंग कोब्रा किंवा अन्य प्रजातीचा साप आढळल्यास सर्प मित्रांना बोलवले जाते. पुढे सर्पमित्र त्यांच्याकडे असणाऱ्या अवजारांच्या मदतीने साप पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतात. सोशल मीडियावर साप रेस्क्यू करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला एक भलामोठा किंग कोब्रा साप एका गाडीच्या बोनेटमध्ये लपला असल्याचे पाहायला मिळते. गाडीमध्ये साप आढळल्याने गाडीचे मालक सर्पमित्रांना बोलवतात. एक सर्पमित्र त्या किंग कोब्रा सापाची शेपूट पकडून त्याला गाडीच्या बाहेर काढून मोकळ्या जागेमध्ये ठेवतो. पुढे तो सर्पमित्र साप पकडण्यासाठीचे यंत्र वापरुन किंग कोब्रावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न करतो. या प्रयत्नादरम्यान किंग कोब्रा मागे वळून सर्पमित्रावर हल्ला देखील करतो. पुढे रेस्क्यू करण्यासाठी आलेला सर्पमित्र महाकाय किंग कोब्रा सापाला एका लांब पिशवीमध्ये टाकण्यात यशस्वी होतो. त्यानंतर सापाला मानवी वस्तीच्या बाहेर सोडण्यात येते.
आणखी वाचा – भयंकर! चिमुकला चक्क मगरीला पाठीवर घेऊन फिरत होता, Video पाहून तुम्ही व्हाल अवाक्
ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या-केल्या व्हायरल झाला आहे. ३ मिलियनपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. १ लाख लोकांनी तो व्हिडीओ लाइक केला आहे. नेटकऱ्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्या अनुभवी सर्पमित्राचे कौतुक केले आहे.