Viral video : माणसाने इतके प्रचंड शोध लावले की, त्यापुढे थक्क व्हावे लागते. बैलगाडीपासून विमानापर्यंत गतीवर मात करणारी साधने माणसाने शोधून काढली. पण, शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो. वीज त्याने घराघरातून खेळवली असली तरी आकाशातील वीज त्याच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीज त्याच्या हाती काही नसते. माणूस दयावंत असतो; पण निसर्गाला दयामाया माहीत नसते. याचंच एक उदाहरण म्हणजे नुकताच झालेला निसर्गाचा आणखी एक प्रकोप. त्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आलाय. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेलात की, तुम्हाला सर्वांत आधी रील्स दिसतात. आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचावी आणि आपले फॉलोअर्स वाढावेत, असा या रील्स बनवणाऱ्यांचा हेतू असतो. रील्सना दशलक्षामध्ये व्ह्युज मिळत असतात. या व्ह्युजसाठी काहीतरी हटके करण्याचा युजर्सचा प्रयत्न असतो, त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतात. रील्ससाठी काही जण तर अगदी जीवही धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये घराच्या गच्चीवर रील शूट करताना वीज कोसळली. यावेळी जे झालं, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. बिहारमधून समोर आलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पावसाच्या वातावरत ही तरुणी गच्चीवर नाचत रील शूट करीत होती. ती नाचत होती आणि पावसाचा आनंद घेत होती. तेवढ्यात जवळच विजांचा प्रचंड मोठा कडकडाट झाला. सुदैवानं याचा थेट फटका मुलीला बसला नाही आणि कोणतीही हानी झाली नाही. मात्र, हे दृश्य इतकं भयानक होतं की, ही वीज जर या तरुणीच्या आसपास पडली असती, तर त्यामध्ये तिचा जीव गेला असता. आता तुम्हीच सांगा यामध्ये तरुणीचं काय चुकलं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईत अंधेरीच्या गोखले पुलावर कारला भीषण आग, वाहनांच्या रांगा; प्रवाशांनो थरारक VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्ली सोशल मीडियाच्या वेडापायी तरुणाईकडून जीवघेणे स्टंट केले जात असताना दिसतात. या स्टंटबाजीमुळे कधी कधी जीवही गमवावा लागतो. मात्र, तरीही नको तिथे रील्स बनविण्याचं वेड कमी होताना दिसत नाही. दरम्यान, अशा प्रकारची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाहीये. याआधीही असे अपघात घडले आहेत. हा व्हिडीओ @sdcworldoffl नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.