Viral Video: इंटरनेट हे मजेशीर व्हिडिओचं वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. कधीकधी इतके विचित्र शोध व टॅलेंट पाहायला मिळते की स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. लंडनच्या एका हेअर आर्टिस्टने अलीकडे असाच एक भन्नाट प्रकार केला आहे. या टॅलेंटेड पठ्ठ्याने एका महिलेच्या केसाने तिच्या डोक्यावर चक्क एक तीन मजली कलाकृती साकारली आहे. बसला ना धक्का? अहो तुम्ही बरोबरच वाचलंयत. स्वतः इंस्टाग्रामने शेअर केलेल्या या व्हिडिओला १७. १ मिलियन व्ह्यूज आहेत. नेमकी कशा प्रकारे ही भन्नाट कला बनवली आहे जाणून घ्या..
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शमारा रोपर नावाची कलाकार एका महिलेच्या डोक्यावर कलाकृती तयार करताना दिसत आहे. तिने मॉडेलच्या केसांना विंचरले आणि धागा वापरून फ्रेमच्या आकाराचे तीन कलाकृती साकारले आहे. काही फिनिशिंग टच देण्यासाठी तिने केसावर गोंडस टेडी बियर देखील जोडला आहे.
GUAP GALA असे या महिलेचे नाव असून तिला परीकथेसारखी थीम असणारी केशरचना हवी होती. गोल्डी लॉक्स म्हणजेच गोल्डन रंगाच्या केसांच्या बटा घेऊन त्यातून काहीतरी भन्नाट करायचे असे या स्टायलिस्टने ठरवले होते .
Video: श्रीमंतीचा माज भोवला! मद्यधुंद तरुणीने वॉचमनला कॉलर खेचून जवळ ओढलं अन तितक्यात..
पहा पंख्याची हेअरस्टाईल..
दरम्यान, या हटके कलाकृतीला पाहता नेटिझन्सना आश्चर्य वाटत आहे. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये याचा प्रत्यय घेऊ शकता. अनेकांनी अशी हटके स्टाईल करण्याचा संयम व हिमंत असलेल्या महिलेचे कौतुक केले आहे तर ती कलाकृती साकारणाऱ्या स्टायलिस्टचेही कौतुक केले आहे.