Tiger Reserve Guide Creates Music with Leaf : जंगल हा शब्द कानावर पडला की, पक्षी, प्राणी, कीटक, झाडेझुडपे, डोंगर, माती या सगळ्यांचे एक चित्र अलगद डोळ्यासमोर येते. तर यासंबंधित आपल्यालाही माहिती मिळावी म्हणून अनेक आयएएस, आयएफएस अधिकारी जंगलातील प्राण्यांची आणि त्यांना सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दलही नवनवीन माहिती फोटो आणि व्हिडीओद्वारे आपल्याबरोबर शेअर करत असतात. तर आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी सुद्धा आज व्याघ्र प्रकल्पातील मार्गदर्शकाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्याघ्र प्रकल्पात मार्गदर्शन म्हणून काम करणारे जेम्स भुतिया यांची आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांच्या बरोबर भेट झाली. त्यांच्या गाणे वाजवण्याच्या टॅलेंटने सगळ्यांनाच थक्क करून सोडले आहे. त्यांनी कोणत्याही वाद्याची मदत न घेता पानांच्या सहाय्याने गाण्याची धून वाजवून दाखवली आहे. तसेच अनोखं टॅलेंट इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आयएफएस अधिकारी यांनी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट केला आणि गाणे ओळखा असे नेटकऱ्यांना आवर्जून सांगितले आहे.
“पानांचा वापर करून गाणे” (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “भेटा जेम्स भूतिया याना हे टायगर रिझर्व्हमधले मार्गदर्शक आहेत. त्यांना आपली कला दाखवण्यासाठी कोणत्याही खास साधनाची किंवा यंत्राची गरज पडत नाही” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून गाण्याची ओळख पटवताना “मला वाटतं हे गाणं १९७१ मधील “कांची रे कांची रे” – हरे रामा हरे कृष्णामधील आहे”.
व्हिडीओ नक्की बघा…
तर अनेक जण व्हिडीओ पाहून टायगर रिझर्व्हमधले मार्गदर्शक यांचे कौतुक करत “हा माणूस म्हणजे चालता-बोलता वन्यजीव सेन्सरच आहे”, “तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये अशी नैसर्गिक कौशल्ये असतात”, “पानांचा वापर करून गाणे… अशा कौशल्यांच्या लहानपणाच्या खूप आठवणी आहेत”. तर एका युजरने मजेशीर कमेंट करत “तो अजूनही जिवंत आहे कारण वाघ त्याच्या कलेमुळे कदाचित खुश आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
