Viral Video: समाजमाध्यमांवर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल ते सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होत असतात,ज्यावर लाखो लोक रील बनवताना दिसतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘नशिबाचा वडापाव’ या गाण्याने समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रुही दोसानी हिने एका परदेशी महिलेबरोबर डान्स करीत वडापाव बनवलेला आहे.
आतापर्यंत लोकप्रिय झालेल्या ‘गुलाबी साडी’, ‘बहरला मधुमास नवा’ यांसारख्या अनेक गाण्यांवर भारतीयांसह परदेशांतील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात किली पॉल, डान्सिंग डॅड यांसारख्या अनेकांचा समावेश आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इन्फ्लुएन्सर रुही दोसानीसह एक परदेशी महिला वडापाव गाण्यावर डान्स करीत वडापाव बनवतात. यावेळी त्या वडापावची संपूर्ण रेसिपी शूट करीत या गाण्यावर ठेका धरतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ruheedosani या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “एकच नंबर.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “जय महाराष्ट्र.” आणखी एकाने लिहिलेय, “छान बनवला वडापाव.”