जंगलातील जीवन हे अतिशय निराळं आहे. कारण इथे जिवंत राहण्यासाठी अगदी क्षणाक्षणाला मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. ज्याला यातून स्वतःचा बचाव करणं शक्य होतं तो शेवटपर्यंत जिंकतो. जीव धोक्यात टाकूनच प्राणी जंगलात आयुष्य जगत असतात. वाघ, सिंह, बिबट्या हे धोकादायक प्राणी समोर आले की जंगलातील इतर प्राणी पळून जातात. या प्राण्यांच्या शिकारीतून कुणाचीच सुटका होत नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका कासवाची शिकार करण्यासाठी एक दोन नव्हे तर चक्क तीन तीन सिंहानी प्रयत्न केले. पण पुढे नक्की काय झालं, ते जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

कासव म्हणजे मंद, शांत प्राणी अशी ओळख. तसं ते कुणावरच हल्ला करत नाही. पण तरी सिंहासारख्या प्राण्याशी पंगा घेणं म्हणजे जरा अतीच झालं नाही का? खरंतर यावर विश्वासही बसणार नाही. पण हे खरं आहे. एका कासवाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन सिंहाच्या शिकारीडा डाव धुकडकावून लावला आहे. हा रोमांचित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा म्हशीला राग येतो…, असा केला हल्ला की सारेच जण गेटमधून बाहेर पडले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावर सिंह कासवाला पकडतो. सिंह समोर पाहून कासव आपले डोके त्याच्या शेलमध्ये लपवून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. हा सिंह त्या कासवाला उलथवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण त्याला तो उलथवता येत नाही. तर कासवही स्वतःला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. यानंतर सिंह कासवाला सोडून दूर बसतो. तेवढ्यात दुसरा सिंह येतो आणि कासवाला पकडण्याचा प्रयत्न करतो. मग कासवाच्या बाजूने काही हालचाल होत नसलेली पाहून तोही तिथून निघून जातो.

आणखी वाचा : पत्नीला बसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी केला भन्नाट जुगाड, मग काय घडलं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हि़डीओ :

आणखी वाचा : बाप-लेकीच्या जोडीचा भन्नाट डान्स, तुम्हीही पहा हा VIRAL VIDEO

जेव्हा सिंह कासवाची शिकार करू शकला नाही…
यानंतर, तिसरा सिंह कासवाला तोंडात ठेवतो आणि १२ ते १५ मिनिटे हिंडतो. पण कासव शांतपणे आपलं डोलं शेलमध्ये घुसवून शांत राहतो. मग हा सिंहही त्याला तोंडातून काढून खाली बसवतो. काही वेळ शांत राहिल्यानंतर कासव हळूहळू नदीकडे सरकतो आणि त्याचा जीव वाचवतो.

आणखी वाचा : गुलाबी थंडीत ब्लँकेटच्या आत मुलगी जे करत होती ते पाहून आई हैराण झाली, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ गीर जंगलातील कमलेश्वर धरणाजवळचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर गिर जंगलाचे मुख्य अधिकारी डॉ. मोहन राम यांनी सांगितले की, ते जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान तीन नर जातीचे सिंह इकडे तिकडे फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. यादरम्यान सिंहिणीची नजर गोड्या पाण्यात राहणाऱ्या कासवावर पडली. कासव पाण्यातून किनाऱ्यावर फिरत होते. सिंहीणी आधी बराच वेळ बघत राहिली आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिला यश मिळाले नाही. कासवानेही जीव वाचवण्यासाठी तोंड आणि पाय शेलमध्ये घेऊन स्वतःला वाचवण्यात यश मिळविले.