Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आई-वडिलांच्या सहवास आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. परंतु, अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन लहान मुलं रडताना दिसत आहेत. ते पाहून नेटकरही हळहळ व्यक्त करीत आहेत.

आईच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते. आईने आपल्याला जवळ घ्यावं, जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं. त्याच्या आयुष्यातील हे क्षण असे असतात, ज्यात त्याला आईचा सहवास सर्वात जास्त वेळ लाभतो. परंतु, कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकला वयाने मोठ्या असलेल्या दुसऱ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असून, यावेळी तो मोठा मुलगा त्याला प्रेमानं कुरवाळत शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्या मोठ्या मुलाच्याही डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत. हा भावनिक व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये आयुष्यात आई-वडिलांबरोबर असणं खूप गरजेचं असतं, असं लिहिण्यात आलेलं आहे. या चिमुकल्यांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरीही हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shree_swami_samrth_akkalkot या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाले आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “असे व्हिडीओ बघितले की, डोळ्यांत डायरेक्ट पाणीच येतं.” दुसऱ्यानं लिहिलंय, “पळत जाऊन, त्याला उचलून घेऊन शांत करावं, असं वाटतंय. ती निरागस लेकरू आहे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “हे बघून टचकन डोळ्यांत पाणी आलं… या मुलांचा मी सांभाळ करू शकतो. कोणाला काही माहीत असेल, तर सांगा प्लीज.”