Viral Video: भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता ‘कतल’ या पंजाबी ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

बॉलीवूडमधील नवी, जुनी गाणी सतत व्हायरल होत असतात. मग काय सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केले गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल त्याची बहिण नीमासह पारंपारिक वेशात नाचताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल आणि त्याची बहिण नीमा खरंच खूप सुंदर डान्स करत आहेत. कतल गाण्यातील स्टेप्सही हुबेहुब करताना दिसत आहेत. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “भाई खूप छान डान्स”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमचा डान्स मला आवडला”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “तू रॉकस्टार आहेस”; तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “सुपर सुपर सुपर डान्स”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.