Viral Video: भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांच्या रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता ‘रानी, तुला साडी-चोळी आणतो मी’ या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल त्याच्या पारंपरिक वेशात आहे. यावेळी त्याच्याबरोबर त्याची बहीणही नाचताना दिसतेय. दोघेही ‘रानी, तुला साडी-चोळी आणतो मी’ गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल खरंच खूप अत्यंत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील त्यांचा डान्स पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मराठी भाषा जगभरात”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमचा डान्स मला आवडला”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “जिंकलंस भावा”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली, तुझा स्वॅग वेगळाच आहे”. तसेच, अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.