आई नववधूच्या रूपात सजून बसली होती…तिच्या मुलीने जी रिअ‍ॅक्शन दिली ते पाहून हैराण व्हाल!

तुम्ही आतापर्यंत मुलीला नववधूच्या रूपात पाहिल्यानंतर भावूक होणाऱ्या आईचे व्हिडीओ भरपूर पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा मायलेकीचा जो व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात नववधू ही मुलगी नव्हे तर आई आहे. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

little-girl-sees-mother-dressed-as-bride
(Photo: Instagram/ guneetvirdimua)

आई-मुलीचं नातं इतर नात्यांपेक्षा खूप जवळचं असतं. मुलगी मोठी झाली की आईसोबत तिची छान मैत्री जमते. दोघी एकमेकींच्या मैत्रिणी होतात. तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर मुलीला नववधूच्या रूपात मुलीला पाहिल्यानंतर भावूक होणाऱ्या आईचे व्हिडीओ भरपूर पाहिले असतील. तसंच मुलीच्या लग्नात आनंदाच्या भरात थिकणाऱ्या आईचे व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा मायलेकीचा जो व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात नववधू ही मुलगी नव्हे तर आई आहे आणि आईला नववधूच्या सजलेलं पाहून मुलीने जी रिअॅक्शन दिली आहे, ते पाहून सारेच जण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह मात्र आवरता येणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलल्या या मायलेकीच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला ही गुलाबी रंगाच्या लेहेंगा आणि आकर्षक दागिने परिधान करून नववधूचा साज श्रृंगार करून बसलेली दिसून येतेय. एक मुलगी तिच्या लग्नांसाठी तयार होऊन बसली असल्याचा भास सुरूवातीला होत असतो. पण काही वेळाने एका चिमुकलीच्या एंन्ट्रीने नेटकऱ्यांना मात्र आश्चर्यचकित करून सोडलं. तिच्या जवळ येणारी चिमुकली ही दुसरी तिसरी कोणी नाही तर व्हिडीओमधल्या महिलेचीच मुलगी असते. आपल्या आईला नववधूच्या रूपात पाहून ही मुलगी तिच्या गोंडसपणाने आईच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येतेय. आपल्या आईला नवरीच्या वेशभुषेत पाहून “तू तर खुप सुंदर दिसतेय…” असे उद्गार ही मुलगी काढताना दिसून येतेय. आपल्या मुलीनं केलेलं कौतुक पाहून नववधूच्या रूपात सजलेल्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. इतकंच नव्हे तर आपल्या आईला नवरी रूपात इतक्या सुंदरतेने सजवल्या बद्दल ती आईच्या मेकअप आर्टिस्टला धन्यवाद सुद्धा बोलताना दिसून येतेय. त्यानंतर ही मुलगी नववधूच्या रूपात बसलेल्या आईला किस करत एक प्रेमळ मिठी सुद्धा मारते.

मायलेकीच्या अतुट नातं दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. मायलेकीचा हा प्रेमळ व्हिडीओ आपलं सारं टेन्शन दूर करत आहे. मनाला भुरळ घालणारा हा व्हिडीओ पाहून सारेच जण या मायलेकीच्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये नववधूच्या रूपात सजलेल्या आईचं नाव अंजली मनचंदा असं आहे. हा व्हिडीओ guneetvirdimua नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होऊ लागला. नववधूच्या रूपातील आई अंजली हिच्या मेकअप आर्टिस्टने हा मायलेकीचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात शूट केलाय.

मायलेकीच्या अतुट नात्याचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३० हजार लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत मायलेकीच्या नात्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही युजर्सतर नववधूच्या वेशभूषेत सजलेल्या आईच्या सौंदर्याचं कौतुक करता आहेत. तर काही युजर्स या व्हिडीओमधल्या गोंडस मुलीच्या रिअ‍ॅक्शनवर आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video little girl sees mother dressed as bride says aap toh bahut sundar lag rahe ho mom as bride mother daughter video prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या