Nepal Protest Viral Video Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चौकशी केली. हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा दावा केला जातो आहे. आंदोलनात एक माणूस हवेत उडणारा टिअर गॅसचा गोळा (tear gas shell) पकडताना दिसला. फक्त पकडलाच नाही तर त्याने तो परत पोलिसांकडे फेकला. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ नेपाळमधील आंदोलनाशी संबंधित नसून तो प्रत्यक्षात पाकिस्तानातील एका जुन्या घटनेचा आहे, त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @Ramrajya ने हा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला आहे. तसेच “मुलाने टिअर गॅसचा गोळा क्रिकेट चेंडूसारखा पकडून परत फेकला. हा व्हिडीओ नेपाळमध्ये व्हायरल झाला आहे”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर युजर्सदेखील हा व्हिडीओ त्याच दाव्यांसह शेअर करत आहेत.
https://twitter.com/VASID1432/status/1965738213143884182
तपास:
आम्ही व्हिडीओमधील कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला हा व्हिडीओ मे २०२२ मध्ये फेसबुकवर अपलोड केलेला आढळला.
https://www.facebook.com/watch/?v=2166019386888470
आम्हाला २६ मे २०२२ रोजी गल्फ टुडेच्या फेसबुक पेजवर तोच व्हिडीओ अपलोड केलेला आढळला.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, पाकिस्तानी आंदोलकाने गॅसचा गोळा पकडला, पोलिसांवर परत फेकला.
https://www.facebook.com/watch/?v=549827946521789
आम्हाला एका वेबसाइटवर देखील हा व्हिडीओ आढळला.
https://www.indy100.com/viral/pakistan-protest-tear-gas-throw
आम्हाला २०२२ मध्ये एक्सवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील आढळला.
व्हिडीओमधील स्क्रीनशॉट्स propakistani.pk या वेबसाइटवर देखील अपलोड केले गेले होते.
पीटीआयच्या वेबसाइटमध्ये म्हटले आहे, एका तरुण कार्यकर्त्याचा गॅसचा गोळा पकडून तो दुसरीकडे फेकतानाचा अविश्वसनीय फुटेज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.सोशल मीडिया युजर्सनी तरुणाच्या शौर्याने प्रभावित होऊन त्याच्या या धाडसी कृत्याची प्रशंसा केली.
निष्कर्ष: एका व्यक्तीने गॅस गोळा कॅच करून पुन्हा फेकल्याचा व्हिडीओ २०२२ मध्ये पाकिस्तानात शूट करण्यात आला होता, त्यामुळे हा व्हिडीओ नेपाळमधील अलीकडच्या आंदोलनातील असल्याचा दावा खोटा आहे.