Viral Video: दिवसभर गाड्यांच्या आवाज, प्रदूषणाचा सामना तर आंदोलन, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक ठिकाणी शहरात कायदा आणि सुवव्यस्था राखण्याचे काम वाहतूक पोलीस करत असतात. वाहनचालकांना ट्रॅफिक नियमांची आठवण करून देणाऱ्या आणि रस्त्यावर विनाकारण ट्रॅफिक होऊ नये याची काळजी घेणाऱ्या वाहतूक पोलिसांचे हाल बिकट होऊन जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक नागरिक वाहतूक पोलिसांना खास वस्तूचे वाटप करताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. बंगळुरूमध्ये काही दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाई आणि वाढत्या उष्ण तापमानाचा सामना करीत आहे. या रखरखत्या उन्हात वाहतूक पोलिसांनाही काम करावे लागते आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन एका नागरिकाने वाहतूक पोलिसांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्याचे ठरवले. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…सुंदर पिचाई यांनी Gmail चा सांगितला ‘तो’ २० वर्षांचा प्रवास; पोस्ट शेअर करीत म्हणाले, ‘हा प्रँक…’

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दुचाकीवरून एक व्यक्ती येतो आणि वाहतूक पोलिसांच्या येथे थांबतो. त्यानंतर त्याने दुचाकीवर ठेवलेल्या पिशवीतून दोन्ही वाहतूक पोलिसांना मोफत पाण्याच्या बाटल्या दिल्या. हे पाहून वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद दिसत आहे; जे पाहून तुम्ही त्या व्यक्तीचे नक्कीच कौतुक कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रॅफिक वॉर्डन, बंगळुरू शहर पोलिस आणि रुग्णवाहिका स्वयंसेवक श्रीराम बिश्नोई यांनी या व्यक्तीबद्दल सांगितले की, दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीचे नाव त्यांना माहिती नाही. पण, ड्युटीवर असणाऱ्या प्रत्येक वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांला ते दररोज पाणी देण्याचे काम करतात. त्यांच्या या कामाला खरोखर सलाम!,अशी माहिती त्यांनी कॅप्शनमध्ये दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShreeRA43002214 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे