सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर लग्नाचे अनेक नवे, जुने, मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आपलं लग्न आठवणीत राहण्यासाठी प्रत्येकजण लग्नात काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या लग्नात डान्सची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. वधू-वराला स्पेशल फिल करवण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नासमारंभातील कार्टून डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लग्नात वधू-वराचे मित्र चक्क शिनचॅन कार्टूनच्या टायटल ट्रकवर कॉमेडी डान्स करताना दिसत आहेत.
मित्रांचा हा कार्टूनपणा सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे, तर काहींना बिलकुल आवडलेला नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता, ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर मित्र- मैत्रिणींचा एक मोठा ग्रुप नाचताना दिसतो. हे गाणं संपताच या मैत्रिणी स्टेजवरून खाली उतरतात. तेवढ्यात शिनचॅन कार्टुनचे हिंदी थीम साँग सुरु होते. ज्यावर तरुणांचा ग्रुप अगदी कार्टुनसारखे हावभाव करून नाचू लागतात. स्टेटसमोर बसलेल्या पाहुण्यांना हा डान्स पाहून हसू आवरणे कठीण होते. पण तेही या तरुणांना डान्ससाठी चिअर्स करताना दिसतायत. अनेकांना या गाण्यामुळे आपले बालपण आठवले.
हा व्हिडिओ कोरिओग्राफर बिपाशा शाहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. ‘जेव्हा तुमचे मित्र तुम्हाला अशा काहीतरी अपेक्षित गोष्टीतून सरप्राइज देतात’, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चार आठवड्यांपूर्वी अपलोड झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत, तर ७९,००० युजर्सनी लाईक्स केले आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, मुलं कोणत्याही गाण्यावर नाचू शकतात. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘आता मला माझे मित्र बदलायचे आहेत’. इतकेच नाहीत तर तिसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा बॅकबेंचर्सना नाचण्यास भाग पाडले जाते’. अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये हसणारे आणि हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर बहुतेकांनी आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करत शिनचॅन कार्टुनवर प्रेम व्यक्त केलं आहे.