प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे साहस दाखवून आपल्या नावावर त्या रेकॉर्डची नोंद करतात. वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करुन हे लोक या करामती करत असतात. त्यांनी करुन दाखवलेल्या या अभूतपूर्व कामांची संपूर्ण विश्व दखल घेतं. अशातच विमानातून उडी मारणं हा सध्या एक रोमहर्षक खेळ म्हणून पुढे येतो आहे. यात लोकं विमानातून पॅराशूटच्या साह्यानं खाली उडी मारतात व एका निश्चित ठिकाणी उतरतात. मात्र पॅराशूटशिवाय जर विमानातून उडी मारली तर? बापरे..विचार करुनच अंगावर काटा येतो ना. मात्र अशा स्टंटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२५ हजार फुटावरुन पॅराशूटशिवाय उडी

२५ हजार फूट उंचीवरून पॅराशूटशिवाय खाली उडीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. पॅराशूटशिवाय २५,००० फूट उंचीवरून कोणी विमानातून उडी मारू शकतं, याची तुम्ही क्वचितच कल्पना करू शकता. अमेरिकन नागरिक ल्यूक एकिन्स वगळता बहुतेक लोकांसाठी हे कदाचित अकल्पनीय असेल. पण हे २०१६ मध्ये हे पहिल्यांदाच घडलं, ज्यात काही तरुणांनी पॅराशूटशिवाय एवढ्या उंचीवरून उडी मारली आणि जाळीत सुखरूप उतरले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – शर्टाच्या डाव्या बाजूलाच खिसा का असतो? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियनहून अधिक व्ह्यूज गेले आहेत. हा खतरनाक स्टंट यांच्या जिवावर बेतण्याचीही यात शक्यता होती.