Viral Video: बदलत्या काळात आता संगणकाची जागा हळूहळू लॅपटॉप, टॅबलेट घेऊ लागले आहेत. संगणक हा ऑफिसच्या कामासाठी सोईस्कर; तर लॅपटॉप हा वर्क फॉर्म होम करणाऱ्यांसाठी सोईस्कर ठरतो. घरून काम करणाऱ्या अनेकांना प्रवास करताना लॅपटॉप बरोबर ठेवावा लागतो. कारण- कोणत्याही क्षणी महत्त्वाचे काम ऑफिसमधून सांगितलं जाऊ शकतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, आज प्रवासात लॅपटॉप घेऊन जाणं एका तरुणाला चांगलच महागात पडलं आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तरुण ड्रायव्हिंग करीत असतो. तसेच त्यानं स्वतःचा लॅपटॉप गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला असतो. यादरम्यान बॉलीवूडच्या प्रिन्स या चित्रपटातील ‘तेरे लिए’ हे प्रसिद्ध गाणं त्याच्या गाडीत वाजताना दिसत आहे. हे गाणं गुणगुणत तो ड्रायव्हिंग करीत असतो. अचानक रस्त्यावर वळण येतं आणि मग पुढे जे घडतं ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्ही पाहा.

हेही वाचा…काय क्रिएटिव्हटी आहे राव! व्यक्तीने खिशात मावेल अशी छापली लग्नपत्रिका; सोशल मीडियावर होतेय चर्चा

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन व्यक्ती कारमधून प्रवास करीत असतात. तसेच जो तरुण या प्रवासात ड्रायव्हिंग करीत असतो. त्याला ऑफिसचं कामसुद्धा करायचं असतं. म्हणून त्यानं गाडीच्या डॅशबोर्डवर लॅपटॉप ठेवलेला असतो. नोटीस पीरियडमुळे प्रवासातसुद्धा ऑफिसचं काम करावं लागतं आहे. हा विषय घेऊन अज्ञात व्यक्ती या दृश्याची रील शूट करून घेत असते. पण, वाहनचालक तरुण गाणं गुणगुणत असताना रस्त्यावर वळण लागतं आणि लॅपटॉप गाडीच्या डॅशबोर्डवरून थेट खिडकीबाहेर पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवास करताना तरुणाच्या बाजूला एक अज्ञात व्यक्ती बसलेली असते. तुम्ही पाहू शकता की, वळण घेत असताना जसा लॅपटॉप बाहेर पडतो तेव्हा तरुण घाबरून लगेच गाडी थांबवतो. व्हिडीओ शूट करणारादेखील हे पाहून थक्क होतो. त्याच्या मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार कैद होतो; जे पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. पण, काही क्षणांसाठी हसूसुद्धा येईल. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ @naitik_bhardwaj__ @ _aayushhsharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.