Viral video: प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमध्ये ते शांत तर काहींमध्ये तो खूपच आक्रमक दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. माकड हा अत्यंत खोडकर प्रवृत्तीचा प्राणी म्हणून ओळखला जातो. यावेळीही त्यानं अशाच एका तरुणाला सळो की पळो करुन सोडलं आहे. मात्र यावेळी चूक ही माकडाची नसून त्या तरुण आणि तरुणीची आहे. आपल्याला माहितीये काही प्राणी आपल्याला मुद्दाम त्रास द्यायला येत नाही मात्र त्यांना त्रास दिला तर ते सोडतही नाहीत. असंच या माकडाची खोड काढणं यांच्या अंगलट आलं आहे. तुम्हीच पाहा व्हिडीओ.

या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगा नदीत एकत्र आंघोळ करताना दिसत आहे. आंघोळ करताना पाहून एक माकड तिथे येते आणि त्यांच्याकडे सतत बघू लागते. माकडाला पाहून मुलगी मस्ती करू लागते, याचवेळी ती त्यावर पाणीही उडवते. पाणी टाकताच माकडाला राग येतो आणि तो पायऱ्यांवरून खाली उतरू लागतो. माकड जवळ आल्याचे पाहून मुलगी घाबरते आणि तिथून पळून जाते. पण मुलगा तिथेच उभा राहतो. या माकडाला वाटतं तरुणानंच पाणी उडवलं आहे त्यामुळे माकड तरुणावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतो.

आधी मुलगा माकडाच्या हालचालींवर लक्ष ठेवतो आणि शांतपणे निघून जातो. मात्र मुलाला जाताना पाहून माकड थेट त्याच्या अंगावर नदीत उडी मारतो. त्यानंतर तरुण घाबरुन माकडाला हाकलून देण्याचा प्रयत्न करतो, पण माकड काही एकायला तयार नाही. माकडाने हल्ला करताच तरुण पाण्याबाहेर येऊन पळू लागतो. माकडही तरुणाच्या मागे धावत सुटतं. यावेळी आजूबाजूचे लोकही हसताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरधाव वेगात आलेली रिक्षा अचानक हवेत उडाली; VIDEO पाहून सांगा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स खूप हसत आहेत. एका यूजरने म्हटले, ‘आम्ही मुले आहोत सर. आमच्या बाबतीत असेच घडते. तर दुसरा म्हणाला, ‘हा नेहमीच मुलाचा दोष नसतो.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘करे कोई और भरे कोई.’