Viral Video: नऊ तासांची नोकरी हे उपजीविकेचे साधन असते; तर कामातून थोडा वेळ काढून एखादी गोष्ट आवडीने करणे म्हणजे छंद असतो. प्रत्येकाच्या आवडी-निवडींनुसार प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ- एखाद्या विषयावर स्वतःचे मत लिहिणे, डान्स क्लास लावणे, चित्र काढणे, शिवणकाम करणे आदी छंद असतात. पण, तुमचा छंद तुम्ही मनापासून जोपासता का? त्यासाठी वेळ काढता का हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. काही जणांना नोकरीच्या कारणास्तव तीव्र इच्छा असतानाही छंद जोपासणे शक्य होत नाही. पण, पोलीस दलातील अमोल यशवंत कांबळे याला अपवाद आहेत.

मुंबई पोलीस दलातील अमोल कांबळे माहीमचे रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासून डान्सची प्रचंड आवड आहे. पोलीस म्हणून कार्यरत होण्याआधी त्यांनी डान्सच्या अनेक कार्यक्रमांतदेखील भाग घेतला होता. पण, पोलीस म्हणून नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही ते आपली पहिली जबाबदारी समजतात. त्यामुळे अमोल कांबळे कामाचे तास संपल्यावर किंवा सुटीच्या दिवशी डान्सचे व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करून स्वतःचा छंद जोपासतात.

हेही वाचा…VIDEO: एकमेकांची काळजी घेऊया…! बदकाच्या पिल्लांना तरुणाचे मार्गदर्शन, रस्ता ओलांडण्यासाठी पाहा कशी केली मदत

व्हिडीओ नक्की बघा…

आज मुंबई पोलीस दलातील अमोल कांबळे यांनी नुकतीच जर्मनीचा टिकटॉक स्टार नोएल रॉबिन्सन (Noel Robinson) यांची भेट घेतली. व्हिडीओत रॉबिन्सन एका वृद्ध व्यक्तीचा फोन चोरण्याचा प्रयत्न करीत पळून जात असतो आणि तितक्यात तो चुकून अमोल कांबळे यांना धडकतो. पोलिसी गणवेश पाहून भीतीने रॉबिन्सन वृद्ध व्यक्तीस फोन परत देतो आणि दोघेही ‘Calm down’ या रॅप गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात. टिकटॉक स्टार रॉबिन्सन आणि मुंबई पोलीस अमोल कांबळे यांचा डान्स एकदा तुम्हीसुद्धा पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर्मनीचा टिकटॉक स्टार नोएल रॉबिन्सन काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. तेव्हा त्याने डान्सर आणि पोलीस अधिकारी अमोल कांबळे याच्याबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अमोल कांबळे यांच्या अधिकृत @amolkamble2799 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तुम्ही कुठूनही आला असाल; तुम्ही पोलिसांसमोर गुन्हा केलात, तर आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ. कारण- आम्ही मुंबई पोलीस आहोत’, अशी भन्नाट कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. अमोल कांबळे यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताच तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.