Viral Video: वडापाव म्हणजे मुंबईकरांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पण, काही दिवसांपासून दिल्लीच्या एका ‘वडापाव गर्ल’ची चर्चा होत आहे. चंद्रिका दीक्षित ही महिला मुंबईसारखा वडावपाव विकण्यात प्रसिद्ध आहे. दिल्लीची ही वडापाव गर्ल एक वडापाव ५० रुपयांना विकते. तसेच मुंबईसारखा वडापाव विकत घेण्यासाठी तिच्या स्टॉलवर लाखो लोकांची गर्दी असते. पण, ५० रुपयांना एक वडापाव विकणाऱ्या या महिलेला तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून बरेच ट्रोल करण्यात आले. हे व्हिडीओ पाहून डॉली चहा विक्रेत्याने वडापाव गर्लची भेट घेतली.

व्हायरल व्हिडीओमध्ये चंद्रिका दीक्षित ही महिला डॉली चायवाल्याच्या शेजारी फुलांचा गुच्छ घेऊन उभी असलेली दिसत आहे. डॉली चहा विक्रेता चाहत्यांना स्वतःची आणि वडापाव गर्लची नेटकऱ्यांना ओळख करून देतो आणि तिला पाठिंबा देण्यास सुरुवात करतो. तो व्हिडीओत म्हणताना दिसत आहे, ”रस्त्यावर उभे राहून आम्ही आमचा व्यवसाय चालवतो. आमच्यासाठी कोणतेही काम छोटे नसते”, असे डॉली चहा विक्रेता म्हणतो.

हेही वाचा…अन्न-पाण्याच्या शोधात हत्तीची मानवी वस्तीकडे धाव, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

व्हिडीओ नक्की बघा…

विक्रेत्याची स्वतःची ‘डॉली की टपरी’ हा चहाचा स्टॉल असल्यामुळे त्याने महिलेची समस्या जाणून, तिची भेट घेऊन तिला पाठिंबा दर्शविला आहे. २० वर्षांपासून डॉली हा चहा विक्रेता स्टॉल चालवतो आहे. त्याच्या हाताची चव आणि त्याच्या अनोख्या स्वॅगमुळे तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तर ही महिला मुंबईसारखा वडापाव विकण्यामुळे प्रसिद्ध आहे. तर आज या दोघांची खास भेट झाली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @dolly_ki_tapri_nagpur आणि @chandrika.dixit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करीत ‘शेवटी वडापाव गर्लला भेटतो. ती खूप मेहनती आहे. कृपया ट्रोल करू नका. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या’, अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे. या प्रसिद्ध विक्रेत्यांची एकमेकांबरोबरची गाठभेट सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.