Viral Video: सोशल मीडिया म्हणजे जगभरातील टॅलेंटेड मंडळींचं हक्काचं घर म्हणता येईल. कधी ही मंडळी स्वतःच व्हिडीओ टाकून लोकांपर्यंत पोहचत असतात तर काहीवेळ त्यांच्या कलेने भारावून गेलेली लोकंच त्यांना जगात व्हायरल करत असतात. व्हायरल व्हिडीओमुळे आजवर अशाच मेहनती व टॅलेंटेड व्यक्तींचं आयुष्य पालटलं आहे. त्यातीलच एक व्हिडीओ आपण आज पाहणार आहोत. या व्हिडिओला आतापर्यंत ४० लाखहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, आता ते नेमके कशासाठी आणि इतका हा व्हिडीओ खास का आहे? चला तर बघुयात…

एका वेटरच्या कामगिरीने सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकाच वेळी अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी हा वेटर डझनहून अधिक प्लेट्स उचलताना दिसतो. त्याच्या अविश्वसनीय कामगिरीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर ट्विटर वापरकर्ते वेटरला पगार वाढ देण्याची मागणी करत आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता हा वेटर,अनेक ताटं घेऊन जाताना दिसतो, एका ट्रेवर त्याने हे सगळं पेलून धरलं आहे. विशेष म्हणजे तो संपूर्ण भार एका खांद्यावर उचलतो. (Video: बिकिनीवर फिरणाऱ्या ललनांवर ‘ही’ साडीतील स्त्री पडली भारी; पाहून तुम्हीही कराल कौतुक)

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर वेटरचे कौतुक करत कमेंटचा वर्षाव केला आहे. काही वापरकर्त्यांनी सांगितले की रेस्टॉरंटच्या मालकाला या माणसाच्या कामातून खूप फायदा होत असल्याने, त्यालाही वेतन वाढ मिळायला हवी. तर काहींनी मात्र हे विनाकारण केलेले स्टंट आहेत असं म्हणत एवढंच होतं तर तीन फेऱ्या मारून सर्वांना जेवण द्यायचं होतं असा सल्ला दिला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ बघून काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरु नका.