Viral Video: लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लग्नसमारंभ किंवा कोणतेही शुभ कार्य म्हटलं की, विवाहित महिला किंवा पुरुषांना उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उखाणे खूप मोठे, ऐकण्यासारखे आणि हटके असतात. आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही विविध पद्धतीचे उखाणे घेणाऱ्या महिलांचे व्हिडीओ पाहिले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही नवरीच्या उखाण्यांचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न पार पडल्यानंतर नवरीच्या गृहप्रवेशासाठी फुलांची सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे. यावेळी माप ओलांडण्यापूर्वी नवरीला सर्व जण उखाणा घेण्याचा आग्रह करतात. यावेळी नवरी एक छान उखाणा घेते.

“आज लग्न जरी झालं असलं तरी सासूबाई मुलगा कायम राहील तुमचाच…
घरात ज्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे आहेत हसरे असे लाखात एक आमचे सासरे,
सासू माझी दुसरी माऊली मला वाटते सुखाची सावली,
संसाराच्या वाटेवर नणंदबाईंनी दिलाय मैत्रिचा हात, सोनलताई तुम्ही कायम दिली बहिणीसारखी साथ,
खीरीत खीर तांदळाची खीर सर्वात रूपवान आहेत माझे दीर,
आज लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे, मी माझी नव्याने ओळख करून देते मी सौभाग्यवती चैताली सौरभ शिंदे.”

हा सुंदर उखाणा घेणाऱ्या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @moment_masters या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “सुंदर नाव घेतलं ताई.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप छान ताई..या जगाला तुझ्यासारख्या जोडीदाराची गरज आहे नाहीतर आपण बघतोयच काय चालू आहे ते..” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “मस्त उखाणा”, तर आणखी एकाने लिहिलेय की, “अप्रतिम.”