सोशल मीडियावर अनेक जण व्हिडीओच्या माध्यमातून आपले टॅलेंट दाखवत असतात. काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की चर्चेचा विषय ठरतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा पोळ्या बनवताना सुरेख गाणं गात आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.
हेही वाचा : भर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट




या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगा स्वयंपाकघरात पोळ्या बनवत आहे. सोबत एक व्यक्तीही त्याच्यासोबत काम करत आहे.
पोळ्या बनवताना तो इतकं सुरेख गात आहे की व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. लोकांना या मुलाचा व्हिडीओ खूप आवडलाय. लोकांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : Viral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर sachkadwahai या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक जण शेअर करत आहे.