Bahut Jagah Hai Viral Video : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा भांडणाचं एकच कारण असतं ते म्हणजे सीट….हे भांडण सुरूवातीला शाब्दिक स्वरूपात सुरू असलं तरी नंतर त्याचं मारामारीत रूपांतर होतं. ही भांडणं पाहण्यासाठी लोक अक्षरशः गर्दी करतात. मग ती मेट्रो असो किंवा सरकारी बस…रोजच्या प्रवाशांना सीट कशी धरायची हे माहीत असतं. पण कधी कधी त्यांच्यासोबतही मोठा गेम होतो. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमधलं भांडणं लोक खूपच आवडीने पाहत आहेत.

सोशल मीडियावर दोन ज्येष्ठांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही अक्षरशः पोट धरून हसाल. “तिथे खूप जागा आहे… जागा नाही” हे ऐकून तुम्ही सुद्धा विचारात पडाल की खरंच तिथे जागा आहे की नाही. गंमत म्हणजे हे दोघेही एकाच सीटवर बसले असताना दोघांमध्ये ही चर्चा होतेय. मात्र, भांडणाची सुरुवात कशी झाली हे समजू शकले नाही. सीटवर दोन जणांना बसण्याची जागा असली, तरी दोघांनीही अॅडजस्ट करायचं नाही असं या व्हिडीओमध्ये दिसतंय. व्हिडीओमध्ये भांडणाची सुरुवात दाखवण्यात आलेली नाही, त्यामुळे भांडण कसं आणि कशासाठी सुरू झालं हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे, परंतु दोघेही एकमेकांना काय बोलत आहेत हे ऐकल्यानंतर हे भांडण जागेवरूनच झाल्याचं दिसतंय.

आणखी वाचा : Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

डावीकडे बसलेली व्यक्ती बोलत आहे, “खूप जागा आहे!” तर उजवीकडील व्यक्ती जोरजोरात ओरडत त्याला उत्तर देतोय आणि म्हणतो, “जागा नाही!” डावीकडील व्यक्ती पुन्हा म्हणते, “मी बोलतोय, खूप जागा आहे!” मग बाजुची व्यक्ती पुन्हा ओरडते, “जागा नाही.” त्यांचं हे भांडण मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट करत तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळे मीम्स देखील शेअर करण्यास सुरूवात केलीय. sagarcasm नावाच्या ट्विटर अकाउंटवरून तर अतिशय मजेशीर दावा करून हा व्हिडीओ शेअर केलाय. “९ वा गुलाब जामुन खाल्ल्यानंतर, मी माझ्या पोटाशी भांडताना..” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, त्यांच्या लग्नाचे VIRAL PHOTOS एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : गाय पाण्यातून चालली होती, अचानक करंट लागून तडफडत जमिनीवर कोसळली आणि मग… पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाख ७२ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि १७ हजार लाईक्स मिळाले आहेत. युजर्स या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. काहींनी विनोदी पद्धतीने तर काहींनी त्यावर गंभीर पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका तरुणीने सांगितले की, ती आणि तिचा भाऊ कूलरसमोर असे भांडतात. एकाने सांगितले की जेव्हा तो सामान बांधतो तेव्हा त्याची बॅग त्याला हेच सांगत असेल.