अस्वल हा प्राणी तसा शांत स्वभावाचा मानला जातो. परंतु जर या प्राण्याला कुणी विनाकारण त्रास देऊ लागलं किंवा चॅलेंज करू लागलं तर ते खूप धोकादायक रूप देखील धारण करू शकतात. पण त्यांच्यासमोर वाघ उभा असेल तर???? हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात आलाच असेल. जर अस्वल आणि वाघ या दोघांची लढाई झाली तर कोण जिंकणार? याचं उत्तर मिळवण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. वाघ आणि अस्वलाच्या लढाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक वाघ अस्वलाच्या मार्गात येतो आणि शिकार करण्याच्या मूडमध्ये बसतो. यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

अस्वल आणि वाघाच्या लढाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. युजर्सना प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ खूप आवडीने बघायला आवडतात, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, अस्वल कुठेतरी मौजमजेसाठी जात असताना अचानक एक वाघ त्याच्या वाटेत येतो. अस्वल शांत असला तरी ते हिंसक तसंच अत्यंत क्रूर असू शकतो. आता जेव्हा दोन बलाढ्य प्राणी समोरासमोर असतात तेव्हा एकमेकांना पाहून दोघांनीही सावध राहणे अत्यावश्यक आहे. इथेही नेमके तेच घडते. अस्वलाला पाहून वाघ काहीच करत नाही. पण अस्वल त्याच्यापेक्षा कमी भीतीदायक असल्याने तो त्याच्या वतीने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच थांबतो.

आणखी वाचा : VIRAL : अवघ्या ६ महिन्याच्या बाळाला एकाच वेळी बसवले ह्रदय आणि इम्यून ग्लॅंड

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : …अन् पोपटाने त्याच्या चोचीच्या मदतीने फडकावला युक्रेनचा झेंडा

आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांमध्ये कोण जिंकतं? कोण आधी माघार घेतं? तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडीओ केवळ ११ सेकंदांचा आहे. यामध्ये वाघाने अस्वलाला आपले भक्ष्य बनवले की सोडून दिले हे कळू शकलेलं नाही. पण व्हिडीओ पाहून अस्वलाने मार्ग बदलल्याचं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघ आणि अस्वलाचा हा व्हिडीओ IFS अधिकारी साकेत बडोला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “थोड्या वेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू देखील लागला. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.