Viral Video Today: माणसाचा उगम जनावरांपासून झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. अगदी विज्ञान बाजूला ठेवलं तरी माणसाची नक्कल करणारे प्राणी नेहमीच याची साक्ष पटवून देतात. बोलका पोपट, नाचणारी कुत्री-मांजरी, यांचे व्हिडिओ दर दिवशी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र आज आपण असा व्हिडीओ पाहणार आहोत ज्यात चक्क एक प्राणी माणसासारखी अंघोळ करताना दिसत आहे.
Beautiifull या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसतोय. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल ४२ लाख व्ह्यूज व दीड लाखाहून अधिक लाईक्स आहेत. या व्हिडिओ मध्ये दिसणारा मोठ्या उंदिरासारखा प्राणी हॅमस्टर म्हणून ओळखला जातो. अलीकडे हॅमस्टर हा अनेक घरात पाळीव असतो.(हे ही वाचा: माणसांना पिंजऱ्यात टाकणारं प्राणी संग्रहालय; वाघ चित्ते सुद्धा झाले चकित, पहा Video)
या व्हायरल व्हिडीओ मध्ये हॅमस्टर एखाद्या माणसाप्रमाणे अंग घासून स्वच्छता करत आहे. तलावातुन अंघोळ करून बाहेर निघाल्यावर तो अंग पुन्हा कोरडे करताना दिसतोय. हा हॅमस्टर विशेष असण्याचे कारण म्हणजे त्याची त्वचा फिकट रंगाची आहे, सहसा हॅमस्टरची त्वचा थोडी गडद रंगाची असते. Crocodile Galloping: मगरीला उड्या मारताना कधी पाहिले आहे का? हा व्हिडीओ एकदा बघाच
पहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने तर याला अंघोळ करताना बघून त्याला माझा शाम्पू द्यायची इच्छा होते आहे अशी कमेंट केली, ज्यावर अनेकांनी हसण्याच्या ईमोजी पोस्ट केल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा एक हॅमस्टर फोटोसाठी पोझ करताना दिसून आला होता. या फोटोग्राफरने हॅमस्टरला एक सुंदर फुल दिले आणि त्यानंतर त्याचे सुंदर हावभाव कॅमेऱ्यात टिपले होते.