आपण अनेकदा कुटुंबाबरोबर हॉटेलमध्ये जेवायला जातो. काही हॉटेलच्या डिझाइन या पारंपरिक किंवा वेस्टर्न थीम्सवर असतात, ज्या अनेक ग्राहकांना आकर्षित करतात. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक तरुणी तिच्या आई-बाबांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाते. पण, हॉटेलची थीम अगदीच अनोखी असते आणि तेथे कमी प्रकाशसुद्धा असतो. तर आई मेन्यू कार्ड पाहण्यासाठी जो जुगाड करते तो पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तरुणी आई-बाबांना घेऊन एका फॅन्सी हॉटेलमध्ये जाते. हॉटेलमध्ये आई-बाबा मेन्यू कार्डमधून पदार्थ काय ऑर्डर करायचा हे बघत असतात. पण, हॉटेलमधील सजावट अगदीच कमी प्रकाशात आणि थोडी स्टाईलिश केलेली असते, त्यामुळे त्यांना मेन्यू कार्डमधील पदार्थांची यादी दिसत नव्हती. त्यामुळे आई एक भन्नाट जुगाड करते. कमी प्रकाशातील हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड पाहण्यासाठी आईने काय जुगाड केला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…कॅज्युअल आहे… प्रवाशांच्या ‘त्या’ कृत्यावर रेल्वे विभागाने Meme शेअर करीत दिली सूचना; पोस्ट व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाबांच्या हातात मेन्यू कार्ड असते. हॉटेलमध्ये कमी प्रकाश असल्यामुळे आई तिच्या मोबाइलचा टॉर्च चालू करते. टॉर्च चालू केल्यावर दोघं मिळून मेन्यू कार्डमधील पदार्थांची यादी पाहतात. तसेच ‘जेव्हा तुम्ही आई-बाबांबरोबर फॅन्सी हॉटेलमध्ये जेवायला जाता…’ असा या व्हिडीओवर मजकूर लिहिण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @yaasvee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘माझ्या आयुष्यात असाच आत्मविश्वास हवा आहे, हायलाइट म्हणजे माझी आई-बाबांना टॉर्च दाखवून सपोर्ट करत आहे’; अशी मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला युजरने म्हणजेच त्यांच्या लेकीने लिहिली आहे.नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. तर काही जण त्यांच्याबरोबर घडलेले असे काही क्षण कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.