Viral Video : जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक म्हणजे आई आणि मुलीचे नाते. आई आपल्या लेकीचे सर्व लाड पुरवते. लहानपणापासून तिला आवडीचे कपडे, तिच्या केसांच्या हेअरस्टाईल, एखादा कार्यक्रम असेल तर तिला स्वतःसारखे कपडेसुद्धा शिवून घेते आणि अगदी छान तयार होते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आईला तयार झालेलं पाहून लेकसुद्धा अगदी हुबेहूब तयार होण्याचा हट्ट करताना दिसते आहे. आईने तिचा हट्ट पुरवला, का चला जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) आई कार्यक्रमानिमित्त तयार होण्यास गेलेली असते. यादरम्यान आईची लेकसुद्धा तिच्याबरोबर असते. मेकअप करणारी महिला आईला लिपस्टिकने भांगामध्ये कुंकू लावत असते. आईला तयार झालेलं पाहून चिमुकलीसुद्धा भांगामध्ये कुंकू लावण्याचा हट्ट करते. हे पाहून मेकअप करणारी महिला आणि चिमुकलीची आईसुद्धा हसू लागते. मेकअप करणाऱ्या महिलेने आणि आईने मिळून लेकीचा हट्ट पुरवला का व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘हा तर रायडर!’ गॉगल लावून, जॅकेट घालून मालकाबरोबर ऐटीत बसला गाडीवर; श्वानाच्या लूकवर नेटकरीही फिदा

व्हिडीओ नक्की बघा…

जेव्हा लेकीला तुमच्यासारखं तयार व्हायचं असतं

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकलीने हुबेहूब आईसारखी साडी नेसलेली दिसते आहे. पण, आईप्रमाणे भांगामध्ये कुंकू लावण्याचा हट्ट चिमुकली करते, तेव्हा खोटं-खोटं कुंकू लावण्याचा अभिनय मेकअप करणारी महिला करते. पण, हे पाहून आपल्याला फसवलं जातंय हे चिमुकलीला समजते आणि ती रडायला सुरुवात करते आणि कुंकू लावलंच नाही असं हिंदीमध्ये म्हणते. मग महिला पुन्हा चिमुकलीला कुंकू लावते. खूप लहान कुंकू लावलं असं म्हणून चिमुकली पुन्हा रडण्यास सुरुवात करते आणि तिला आईसारखं दिसायचं आहे असा तिचा हट्ट सुरूच असतो. तिथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने या मजेशीर गोष्टीचा व्हिडीओ शूट करून घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही चिमुकली तीन वर्षांची आहे असं व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर @neha_waraich_grover_nwg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एवढं सोपं नसतं… जेव्हा लेकीला तुमच्यासारखं तयार व्हायचं असतं’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा पोट धरून हसताना दिसत आहेत, तर काही जण चिमुकलीने खूप सुंदर साडी नेसली आहे, असं कमेंट करताना दिसत आहेत.