साप नुसता पाहिला तरी सर्वांच्याच मनात भिती निर्माण होते. त्यात त्याने जर फणा काढला तर अंगावर काटा उभा राहतो आणि तो आपल्याला चावेली की काय, अशी धडकी भरते. एक साप पाहिला तरी आपली अशी अवस्था होते, कल्पना करा की जर एक दोन नव्हे तर तब्बल ३०० साप समोर आले तर??? होय, हे खरंय. एका माणसाने या ३०० सापांसोबत असं काही केलं की बघून सारेच जण हैराण झाले आहेत. एखादा कचरा जमा करावा तसं या ३०० सापांना एका पोत्यात जमा करून एका माणसाने त्यांना जंगलात आणलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका जंगलातला असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस हिरव्या रंगाचं पोतं घेऊन जंगलात आलेला दिसत आहे. या पोत्यात त्या माणसाने अगदी कचऱ्याप्रमाणेच तब्बल ३०० सापांना जमा केलेलं आहे. हे पोतं उलटं करत हा माणूस त्यातले साप जमिनीवर टाकताना दिसून येतोय. त्याने आपल्या हातात पकडलेल्या पोत्यातून सापच साप बाहेर पडतानाचे दृश्य फारच भयंकर आहे. यातून बाहेर पडत असलेला प्रत्येक साप सरपटत जंगलाच्या दिशेने जाताना दिसून येत आहे. हा थरार फक्त इथेच संपत नाही.

आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO

हा माणूस फक्त इथेच थांबत नाही तर सगळी पोतं रिकामं केल्यानंतर तो खाली बसतो आणि एकमेकांमध्ये अडकलेले साप सोडण्याचा प्रयत्न करतो. हा माणूस स्वतः त्याच्या हाताने या सापांना गुंता सोडवताना दिसून येत आहे. काही वेळासाठी असं वाटतं की यातला एखादा साप त्याच्या हाताला दंश तर करणार नाही, अशी भीती मनात येऊ लागते. पण सुदैवाने या ३०० सापांपैकी एकही साप या माणलासा कोणतीही इजा पोहोचवीत नाही.

आणखी वाचा : हे काय? रॅम्पवॉक करताना मॉडेल अचानक प्रेक्षकाला मारू लागली, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

यापुढचं एक दृश्य तर याहूनही भयंकर आहे. सर्व साप सोडल्यानंतर शेवटी एक साप या माणासाच्या पायाखालील दबला जातो, याची जाणीवच त्या माणसाला नसते. सर्व साप जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर त्याच्या पायाखाली एक साप या माणसाला दिसून येतो. आता या माणसाने सापाला पायाखाली दाबलं म्हटल्यावर तो साप दंश करतो की काय असं देखील वाटू लागतं. पण हा माणूस त्या सापाला सुद्धा त्याच्या हाताने आपल्या पायाखालून बाजुला करतो. त्यानंतर हा साप सुद्धा जंगलाच्या दिशेने निघताना दिसून येत आहे. शेवटी हा व्यक्ती हात जोडून नमस्कार करताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चमकदार डोळे असलेला हा रहस्यमय सागरी प्राणी बोटीवर बसलेल्या मच्छिमाराचा पाठलाग करत होता आणि….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरारारा खतरनाक ड्रायव्हिंग! पठ्ठ्याने तर कमालच केली; VIRAL VIDEO पाहून भलेभले पडले गार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ‘memewalanews’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स नेहमीप्रमाणे आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हे दृश्य कोणत्या ठिकाणचं आहे, याची माहिती मिळालेली नाही. पण आता हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.