मसाला स्ट्रॉबेरी! कधी चव चाखली आहे का? VIRAL VIDEO पाहून नेटिझन्स संपातले

स्ट्रॉबेरीला चॉकलेटसोबत जोडून तयार केलेली आईस्क्रीम लोकांनी स्वीकारली. जास्तीत जास्त फ्रूट सॅलड, कस्टर्ड, व्हॅनिला आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी स्लाइस टाकून तयार केलेले पदार्थ हे ठीक होतं. पण आता ‘मसाला स्ट्रॉबेरी’ च्या नव्या डिशचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून स्ट्रॉबेरी प्रेमी हैराण झाले आहेत.

Masala-Stawberry-viral-video
(Photo: Instagram/ ourcollecti0n)

सोशल मीडियावर सध्या विचित्र पदार्थांचा ट्रेंड सुरूय. एकामागून एक विचित्र पदार्थांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. आता थेट स्टॉबेरीवर नव नवे प्रयोग करत विचित्र रेसिपी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अनेकांना स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड आईस्क्रीम खूप आवडते. स्ट्रॉबेरीला चॉकलेटसोबत जोडून तयार केलेली आईस्क्रीम लोकांनी स्वीकारली. जास्तीत जास्त फ्रूट सॅलड, कस्टर्ड, व्हॅनिला आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी स्लाइस टाकून तयार केलेले पदार्थ हे ठीक होतं. पण आता याच स्ट्रॉबेरीवर आणखी नवा प्रयोग करत ‘मसाला स्ट्रॉबेरी’ नेटकऱ्यांच्या भेटीला आलीय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून स्ट्रॉबेरी प्रेमी हैराण झाले आहेत.

तुम्ही आतापर्यंत फ्रूट चाट खाल्ले असतील. फ्रूट चाटच्या हलक्या आंबट-गोड चवीची कल्पना करा की, त्यात जर चटणी, मीठ आणि मिरपूड पडली तर त्याचं काय होईल? अशीच परिस्थिती शेजारच्या बांगलादेशातील स्ट्रॉबेरी डिशबाबत झालीय. एका विक्रेत्याने गोड फळांना आचारी तडका देत नवी डिश लोकांसमोर आणलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

या नव्या डिशचं नाव ऐकायला जितकं विचित्र वाटतंय तितकंच हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला आणखी धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला फळांच्या टोपलीत भरपूर स्ट्रॉबेरी घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. सुरूवातीला त्याने स्ट्रॉबेरीचे तुकडे केले. नंतर एका वाडग्यात स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे सोलून काढल्या. त्यात कासुंदी, मीठ, मसूर पावडर… असे अजून बरेच मसाले आहेत. नंतर वाडग्याचे तोंड बंद केलं आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव केलं. जेणेकरून स्ट्रॉबेरीचे तुकडे या मसाल्यांमध्ये मिसळून जातील.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थंडी वाजते म्हणून मुलीने ओढणी मागितली, तर पाहा आई काय म्हणाली?

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बाप रे बाप! एवढा मोठा अजगर तुम्ही कधी पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप…

हा व्हिडीओ बांगलादेशातला असल्याचं कळतंय. हा व्हिडीओ Our Collection नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटिझन्सना अक्षरशः धक्काच बसलाय. अनेकांनी एकमताने यावर कमेंट करत म्हटलंय, ‘स्ट्रॉबेरीचा असा प्रयोग भयंकर आहे.’ बहुतेक नेटकऱ्यांना हा विचित्र प्रयोग अजिबात आवडला नाही. पण तुम्हाला ही विचित्र डिश आवडली नसली तरीही या व्हिडीओने आतापर्यंत ६.५ मिलियन व्ह्यूज पार केले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता हेअर ड्रायर विकत घेण्याची गरज नाही! हा देसी जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल What An Idea !

अनेक नेटकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या तुकड्यात मसाले घातल्यानंतर ते फारसे वाईट वाटत नाही, पण ते खायला खूपच वाईट असावे असं म्हटलं आहे. हे फूड-फ्युजन पुन्हा एकदा करून पाहणार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओला ३ लाख ६३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर आणखी दुसऱ्या यूजरने विचारले की हे स्ट्रॉबेरी लोणचं बनतंय का? अनेक नेटकऱ्यांनी तर हा व्हिडीओ पाहून हातगाडीवरील अस्वच्छततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video of masala strawberry leaving people in coma on social media google trending video today prp