काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यामुळेच कदाचित त्यांना पाळीव प्राणी असं म्हटलं जातं. परंतु या पाळीव प्राण्यांना जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर झाला तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते घातक ठरू शकतात. मग अशावेळी त्या चवताळलेल्या प्राण्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं. परंतु काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शांत उभा असलेल्या बैलाशी पंगा घेणं एका आजोबांना चांगलंच महागात पडलं. मग काय आला अंगावर, घेतला शिंगावर या म्हणीप्रमाणे बैलाने या आजोबांना चांगलीच अद्दल घडवली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या २७ सेकंदांचा असला तरी त्यात जीवनाचं सार दिसून येत आहे. ‘जसे कर्म तसे फळ’ हा नियतीचा नियम सर्वांनाच माहितेय. ही म्हण सिद्ध करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबांच्या कर्माचं फळ अवघ्या दोन सेकंदातच मिळालं. खरं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये, एक आजोबांना न जाणे काय सुचलं आणि त्यांनी रस्त्यावर शांत उभा असलेल्या बैलाला काठीने मारलं. मग काय? बैलाला राग येतो आणि या आजोबांना त्यांच्या कर्माचं फळ मिळतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नऊ महिन्याच्या बाळाचे ‘हे’ पहिले शब्द ऐकून फक्त पालक नव्हे तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल

हा व्हायरल व्हिडीओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगसारखा दिसून येतो. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक बैल रस्त्याच्या कडेला शांत उभा असल्याचं दिसत येत आहे. तेवढ्यात पांढरा धोतर-सदरा घातलेले एक आजोबा हातात काठी घेऊन तिथून जातात. रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा असलेल्या बैलाला काठीने मारतात. मग बैलालाही राग येतो आणि आजोबांना आपल्या शिंगांनी हवेत उडवलं आणि धाडकन जमिनीवर आपटलं.

बैलाशी पंगा घेणं या आजोबांना चांगलंच महागात पडलं आहे. आपल्याशी पंगा घेणाऱ्या आजोबांना धडा शिकवून हा बैल पुढे जातो आणि आजोबा काही वेळ आहे त्याच ठिकाणी बसलेले दिसून येत आहेत. बैल थोडं पुढे गेल्यानंतर आजोबा सुद्धा आपल्या हातातल्या काठीच्या मदतीने उठतात आणि मग आपल्या मार्गाला जातात.

आणखी वाचा : धाडसाची कमाल! घरात आग लागली होती, भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीने काय केलं? पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा तीन खतरनाक किंग कोब्रांमध्ये बैठक होते…VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले, “गंभीर चर्चा सुरूये”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला धडकीच भरते. तशाच कमेंटही हा व्हिडीओ पाहून येत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने या घटनेला आजोबाच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ आतारर्यंत ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच लोकांनी यावर आपली मते आणि सूचनाही दिल्या आहेत.