सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिएटिव्हिटी असल्यानं अनेक लोक हे सोशल मीडियावर गाणी किंवा त्यासंदर्भातले व्हिडिओ पोस्ट करत असतात. गेल्या वर्षी करोनाकाळात एका रेल्वे स्टेशनवरून रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यानंतर आता आणखी एका महिलेच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे. या महिलेच्या आवाजातली मधुरता सर्वांचं मन प्रसन्न करत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला चपाती बनवताना दिसून येत आहे. तिचा मुलगा येतो आणि तिला गाणं गाण्यासाठी सांगतो. त्यावर ही महिला म्हणते की, त्याने काही वेळापूर्वीच गाणं गायला सांगितलं होतं. यावर मुलगा म्हणतो की, त्याला तिचा आवाज खूप आवडतो, त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तिचा आवाज ऐकायचा आहे. मुलाच्या या आग्रहावर महिला चपाती बनवता बनवता गाणं गायला सुरूवात करते. या व्हिडीओमध्ये महिला ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणं गाताना दिसून येतेय. यावेळी ती अगदी मनापासून हे गाणं गाताना दिसतेय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची गुपचूप शिकार करणार होती सिंहीण, पण संपूर्ण डावच उधळला

या व्हिडीओमध्ये गाणं गात असताना ही महिला गाण्यात पूर्णपणे रमून गेलेली दिसून येतेय. एकीकडे ती हाताने चपात्या लाटताना दिसून येतेय दुसरीकडे ती तिच्या गोड आवाजात सुरांची उधळण करताना दिसून येतेय. खरं तर हे गाणे ज्या पद्धतीने स्त्री गुणगुणत आहे, ते हृदयाला भिडणारं आहे. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही महिला इतक्या सुंदर पद्धतीने गाणं गायलंय हे खरोखरंच मनोरंजक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रीच्या गायनाचा सर्वात मोठा फॅन तिचा मुलगा आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एक दोन नव्हे तर तब्बल २७ जण रिक्षामध्ये बसले होते, पाहून पोलीस सुद्धा चक्रावले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हात, पाय, तोंडात धरून फळे घेऊन जाणाऱ्या या चिंपांझीचा VIDEO VIRAL, पाहून पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ‘नितेश स्रीव’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “अतिसुंदर…साक्षात देवी सरस्वतीचा वास हिच्या कंठात आहे.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. लोक या व्हिडीओवर कमेंट करत महिलेच्या गोड आवाजाचं कौतुक करताना दिसून येत आहे.