Viral video: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हुडहुडी भरली की, सकाळी उशिरापर्यंत अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. अशा स्थितीत उणे तापमानामध्ये बर्फाळ प्रदेशात राहणारे लोक आणि प्राणी कसे जगत असतील याचा विचारही न केलेला बरा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती घराच्या बाहेर पडताच काही सेकंदात तिचे केस बर्फाने गोठून गेले आहेत.

महिलेचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ स्वीडनमधला आहे. जगामध्ये अशी काही ठिकाणं आहेत. जिथे एवढी थंडी असते की तुमच्या डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात. अतिशय थंड हवेमुळे हाडं गोठणारी थंडी आहे. अशावेळी खाण्या-पिण्याचे पदार्थ तोंडात जाण्यापूर्वीच गोठलेले असतात. इथलं वातावरण इतकं गोठलं आहे की, इथे कोणीही काहीही पिऊ शकत नाही.संघर्षपूर्ण वातावरणात हे सर्व पदार्थ खाण्यायोग्य करण्यातच जास्त मेहनत होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्वीडनमध्ये पडलेल्या थंडीत चक्क तिचे केस बर्फासारखे जमले आहेत. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’तापमान -30 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे’.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या स्वागताला दादा भुसेंचं तीन पावली नृत्य; VIDEO होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वीडनमध्ये सध्या प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. पारा ३० अंशावर घसरला असून बर्फासह धुक्याची चादर पसरली आहे. यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हा व्हिडीओ @exploring.human नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत.