Viral Video: गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात. बाप्पाची भक्ती, सेवा यांसह बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि नंतर बाप्पाच्या जाण्याचं दुःख अनेकांच्या डोळ्यांत पाहायला मिळतं. गणोशोत्सवात मोदक, मूर्ती, सजावटीबरोबरच गणपती डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्यक्ती वयाने लहान असो किंवा वृद्ध, लहान-लहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद दडलेला असतो. आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणं आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे. पण, पूर्वीच्या लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत. सोशल मीडियावर विविध वयोगटातील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यात काही वृद्ध महिलांचा डान्स व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही काही वृद्ध महिलांचा एक ग्रुप बाप्पाच्या ‘अशी चिक मोत्याची माळ’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. वृद्ध महिलांमधील या उत्साहाचे सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shantai_second_childhood या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “आजीबाई एकच नंबर नाचलात”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपच छान डान्स”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आजी खूप खूप प्रेम”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “मन कधीही म्हातारे होत नाही.”