Viral Video :- काही जण प्राण्यांना बघून दूर पळून जातात; तर काही जण त्यांना बघून अलगद जवळ घेतात. तुमच्यातील अनेक जण प्राणीप्रेमी असतील, जे रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसलेल्या प्राण्यांना उचलून घरात घेऊन येतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांची देखभाल करून त्यांच्यावर खूप प्रेम करताना दिसून येतात. तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका फोटोग्राफरने एका जखमी प्राण्याला मदत केली आणि या दरम्यान त्यांची मैत्री जुळून आली.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ एका जंगलातील आहे; जिथे एक जखमी चित्ता बसलेला तुम्हाला दिसेल. या जखमी चित्त्याला एक फोटोग्राफर पाणी पाजताना दिसून येत आहे. चित्त्याला अशा अवस्थेत पाहून, फोटोग्राफर काही जणांच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जातो आणि चित्त्यावर उपचार केले जातात. डॉक्टर चित्त्यावर उपचार करताना तुम्हाला व्हिडीओतसुद्धा दिसून येईल. दवाखान्यात डॉक्टरांनी केलेले उपचार यशस्वी होतात आणि चित्ता पुन्हा जंगलातील त्याच्या पिंजऱ्यात रहायला जातो; तर काही दिवसांनी फोटोग्राफर चित्त्याला भेटायला पुन्हा जंगलात येतो आणि तेव्हा फोटोग्राफरला बघून चित्ता अगदी लहान बाळासारखा वागतो आणि फोटोग्राफरच्या जवळ जातो. फोटोग्राफर संकटाच्या काळात चित्त्याला मदत करतो, हे कदाचित चित्त्याने लक्षात ठेवले असेल म्हणूनच फोटोग्राफरला बघताच चित्त्याने कृतज्ञता दर्शवली असे म्हणायला हरकत नाही आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा जेव्हा हा फोटोग्राफर चित्त्याला भेटायला जातो, तेव्हा तेव्हा अगदी जिवलग मित्रासारखा हा चित्ता फोटोग्राफरला भेटताना दिसून येतो.

हेही वाचा :- जबरदस्त! लेझीम पथकाचे नृत्य पाहून तुम्हीही उत्साहाने नाचू लागाल! नेटकरी म्हणतायत,”व्हिडीओ एकदा पाहाल तर…”

व्हिडीओ नक्की बघा :-

सोशल मीडियावरील हा (@1hakankapasu) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण ‘आपण प्राण्यांकडून खूप काही गोष्टी शिकू शकतो’; तर काहीजण ‘हा एक सुंदर अनुभव आहे’, असे कमेंटमधून म्हणत त्यांच्या विविध भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.